संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण

0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण

संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात वटपौर्णिमेनिमित्त श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव प्राचार्या रेखाताई तरडे हाके यांच्या हस्ते दहा वडाची रोपे होते लावण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे प्रकल्प अधिकारी साहेबराव शेवाळे, शहर समन्वय राहुल चव्हाण, प्राथमिक मुख्याध्यापक आशा रोडगे, माध्यमिक मुख्याध्यापक मीना तोवर, रोकडोबा कुंडगीर, नंदकुमार मध्येवाड, सतीश साबणे, बब्रुवान कलाले,उमेश फुलारी, पद्माकर नळगिरे, विवेकानंद सुरनर,शिला तेलंगे सह महिला उपस्थित होत्या. महाराष्ट्र शासनाने दहा कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.दत्तात्रय मठपती यांनी वटपौर्णिमेनिमित्त दहा वडाचे रोप लावण्याचे आवाहन केले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा रोपं देवून सत्कार करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!