स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूरची संयुक्त कार्यवाही; 1 लाख 37 हजारांचा गांजा जप्त

0
स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूरची संयुक्त कार्यवाही; 1 लाख 37 हजारांचा गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूरची संयुक्त कार्यवाही; 1 लाख 37 हजारांचा गांजा जप्त

अहमदपूर (गोविंद काळे) : लातुर जिल्ह्यातील अवैद्य धंद्याना आळा घालण्यासाठी पोलीस अधिक्षक यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला सुचना दिली असुन तालुक्यातील हगदळ येथील एकाच्या शिवारात स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांनी संयुक्त कारवाई करत
दि 11 जुन रोजी रात्री अचानक छापा टाकून 01 लाख 37 हजार रुपये किंमतीचा 09 किलो गांजाच्या झाडासह एक जणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याविषयी सविस्तर माहीती अशी की,लातुर जिल्ह्यातील अवैद्य धंद्याना आळा घालण्यासाठी पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला सुचना दिली असुन त्यानुसार अवैद्य धंद्यावर कार्यवाही करण्यात येत आहे
त्याअनुशंगाने अहमदपूर तालुक्यातील हगदळ शेत शिवारात गांजाची लागवड होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती मिळालेल्या माहीतीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा लातूर व पोलीस ठाणे अहमदपूरच्या पोलिसांनी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे स्थानिक गुन्हे शाखा लातुर पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिराप्पा भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव, सहाय्यक फौजदार दिंडगे, पोलीस अंमलदार तुराब पठाण, कैलास चौधरी, कछवे, मदने, सुकेश केंद्रे, सूर्यवंशी, विशाल मुंडे, आदींच्या एका पथकाने संयुक्त कार्यवाही करत दि 11 रोजी रात्री हगदळ गावाच्या शेत शिवारातील राजू उर्फ देवराव, मुंडे वय 32 वर्ष, राहणार हगदळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांच्या शेतात अचानक छापा टाकून 01 लाख 37 हजार 775 रुपयांचा 9 किलो वजनाची झाडे जप्त करण्यात आली असुन सदर गुन्ह्यात शेतमालक 1) राजू उर्फ देवराव, मुंडे वय 32 वर्ष, राहणार हगदळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर याला अटक करण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!