कार व बसचा अपघात : पाच जण जखमी

0
कार व बसचा अपघात : पाच जण जखमी

कार व बसचा अपघात : पाच जण जखमी

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरापासुन जवळ असलेल्या मरशिवणी येथे सकाळी ८ वाजता मरशिवणी बायपास रोड येथे कार क्रमांक एम.एच. २९सी. जे.०४३४ व बस क्रमांक एम.एच. ०९ एफ.एल. ०५४६ या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील पाच जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने येणारी बायपास बस वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे कारवर आदळली. जोरदार धडकेत कारच्या समोरच्या भाग चक्काचूर झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
जखमींमध्ये अनिल विजय दुरवे ( ३४ वर्ष ) रा. यवतमाळ, रोहित दिलीप वनवे ( ३० वर्ष ) रा. यवतमाळ, अमोल चव्हाण ( ३२ वर्ष ) रा. यवतमाळ, विजय शंकर मडकंम( ३२ वर्ष )रा. यवतमाळ, जीवन देविदास माडवी ( ३० वर्ष ) रा. यवतमाळ
यांचा समावेश आहे. जखमींना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पूढील उपचारांसाठी नांदेड येथील शासकिय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.जखमीपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघात स्थळी पोलिस आणि ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका तातडीने
धाव घेऊन जखमींना उपचारांसाठी दाखल केले.अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा अधिक तपास प्रक्रिया सुरू होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!