मारोती कसाब यांच्या ‘रातंदिन असे’ काव्यसंग्रहाचा एमजीएम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

0
मारोती कसाब यांच्या 'रातंदिन असे' काव्यसंग्रहाचा एमजीएम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

मारोती कसाब यांच्या 'रातंदिन असे' काव्यसंग्रहाचा एमजीएम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. मारोती कसाब यांनी लिहिलेल्या ‘ रातंदिन असे ‘ या काव्यसंग्रहाचा छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठाच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात समावेश झाला असून, त्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रातील नामांकित विद्यापीठांपैकी एक असलेल्या महात्मा गांधी मिशन संचलित एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून एम.ए. मराठीचा नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून, एम.ए. द्वितीय वर्ष तिसऱ्या सत्रात ‘ विशिष्ट साहित्य प्रकाराचा अभ्यास- कविता’ या अभ्यास पत्रिकेत डॉ.मारोती कसाब यांनी लिहिलेल्या आणि देगलूर येथील गणगोत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘रातंदिन असे ‘ या कविता संग्रहाचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. मारोती कसाब यांचे ‘ पोरगं शेकत बसलंय ‘, ‘ रातंदिन असे ‘ या दोन काव्यसंग्रहासह ‘समकालीन साहित्य आणि समीक्षा’, ‘ सीमालढ्याचे नायक भाई बापूसाहेब एकंबेकर’, ‘ शंकर भाऊ साठे व्यक्तित्व आणि कर्तृत्व’, ‘ मातंग : इतिहास आणि संस्कृती’ आदी ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
‘ रातंदिन असे ‘ या काव्यसंग्रहातील कविता म्हणजे ‘ कपाळी लोकशाहीचा मळवट भरून क्रांतीचा उद्घोष करणारी वास्तववादी कविता आहे ‘ , अशा शब्दांत प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी मारोती कसाब यांच्या कवितेचा गौरव केला. समकालीन राजकारणावर परखड भाष्य करणारी ही कविता नवी सांस्कृतिक मांडणी करणारी आहे असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बब्रुवान मोरे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. नागराज मुळे, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. सचिन गर्जे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह. भ.प. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले, तर आभार शीघ्रकवी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!