प्रा.डॉ. प्रशांत बिरादार यांच्या ‘काव्यालंकार’ ग्रंथाचा प्रकाशन समारंभ संपन्न

0
प्रा.डॉ. प्रशांत बिरादार यांच्या 'काव्यालंकार' ग्रंथाचा प्रकाशन समारंभ संपन्न

प्रा.डॉ. प्रशांत बिरादार यांच्या 'काव्यालंकार' ग्रंथाचा प्रकाशन समारंभ संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांच्या काव्यालंकर या ग्रंथाचे प्रकाशन किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार हे संस्कृतचे ज्येष्ठ संशोधक असून त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष पद भूषविले असून ते विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. बिरादार यांचे आता पर्यंत संस्कृत साहित्याशी संबंधित सात ग्रंथ लिहिले असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बी.ए. संस्कृत पाठ्यक्रमाशी संबंधित काव्यालंकार हा ग्रंथ नुकताच किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. शिंदे, ज्येष्ठ कार्यकारणी सदस्य ज्ञानदेव झोडगे, कार्यकारणी सदस्य तथा युवानेते पृथ्वीराज अशोकराव पाटील एकंबेकर, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्यासह उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!