रोटरी क्लब अहमदपूरच्या अध्यक्षपदी कपिल बिरादार तर सचिवपदी धीरेंद्र ढेले यांची निवड
रोटरी क्लब अहमदपूरच्या अध्यक्षपदी कपिल बिरादार तर सचिवपदी धीरेंद्र ढेले यांची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : अनेक वर्षापासून सेवाभावाने कार्य करणाऱ्या रोटरी क्लब अहमदपूर 2025-26 वर्षासाठी अध्यक्ष म्हणून शैक्षणिक व सामाजिक कार्यात आवड असणारे रो कपिल बिरादार तर सचिव पदी युवा उद्योजक धीरेंद्र ठेले यांची निवड करण्यात आली..
दि 19 जून रोजी विद्यमान अध्यक्ष ,राजेंद्र कल्याणे यांच्या अध्यक्षतेखाली, सहाय्यक प्रांतपाल चंद्रशेखर मुळे चाकूर, ज्येष्ठ रोटेरियन डॉ पांडुरंग कदम, डॉ चंद्रकांत उगीले यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक होऊन
2025-26 अध्यक्ष सचिवासह क्लब ट्रेनर महेंद्र खंडागळे, कोषाध्यक्ष नजीब पठाण, उपाध्यक्ष डॉक्टर अंजली उगिले, यासह रोटीच्या विविध समित्यावर गंगाधर याचवाड, शिवशंकर पाटील, धनंजय कोत्तावार, सचिन करकनाळे , अनिल चवळे, भरत ईगे, डॉ वसंत बिरादार, डॉ शिवप्रकाश निजवंते, नरसिंग चिलकावार, आशिष हेंगणे, मोहीब कादरी, डॉ निलेश मजगे, संगीता खंडागळे, माधव वलसे, रामचंद्र गंगथडे, गोपाळ पटेल, ज्ञानोबा भोसले, डॉ अतुल खडके, संतोष मद्देवाड, द मा माने, प्रशांत घाटोळ, संजय गोटमवाड, मनोज आरदवाड, बालाजी पटवारी, डॉ रामेश्वर चामले, इंजिनीयर अनिल फुलारी, शिवाजी पाटील, श्रीराम कलमे पांडुरंग गरुड संचालक मंडळाच्या बैठकीत पुढील वर्षभरात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, गरजू लोकांना मदत, वृक्षारोपण संवर्धन, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, महिलांसाठी उपक्रम, शिक्षक पुरस्कार, स्वच्छता अभियान यासह अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले. या बैठकीस संचालक मंडळासह रोटरी क्लब अहमदपूरचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
