किलबिल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात…

0
किलबिल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात…

किलबिल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात…

अहमदपूर (गोविंद काळे) : किलबिल नॅशनल स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी केंद्रप्रमुख, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदरणीय बालाजीराव शिंदे सर होते. शाळेच्या प्रांगणात सकाळी लवकर योग अभ्यास सुरू झाला.सरांनी विविध योग प्रकार करून दाखवले त्यासोबतच योगाचे महत्त्व समजून दिले. प्राणायाम ही काळजी गरज असून प्रत्येकाने सकाळी किमान एक तास आपल्या शरीरासाठी दिला पाहिजे. करो योग रहो निरोग म्हणीप्रमाणे योगाभ्यास गरजेचा आहे. योगा प्राणायामासाठी शाळेचे संचालक ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!