टाकाऊ कपड्या पासून यशवंत विद्यालयात साकारले फलक पुसण्यासाठीचे डस्टर (हस्तकलेतील नाविन्यपूर्ण उपक्रम)

0
टाकाऊ कपड्या पासून यशवंत विद्यालयात साकारले फलक पुसण्यासाठीचे डस्टर (हस्तकलेतील नाविन्यपूर्ण उपक्रम)

टाकाऊ कपड्या पासून यशवंत विद्यालयात साकारले फलक पुसण्यासाठीचे डस्टर (हस्तकलेतील नाविन्यपूर्ण उपक्रम)

अहमदपूर (गोविंद काळे) : यशवंत विद्यालयात आनंददायी व मनोरंजनात्मक कलेतून विद्यार्थ्यांना विविध हस्तकलीचे धडे अध्यापनातून दिले जातात. नाविन्यपूर्ण व पर्यावरण पूरक उपक्रमातून यावेळी विद्यार्थ्यांनी टाकाऊ कपड्या पासून फळा पुसण्यासाठीचे डस्टर तयार करून हस्तकलेचे प्रदर्शन साकारले.
कला विषय हा बहुस्पर्शीय विषय असून प्रत्येक विषयात कलेची जोड देऊन विषय आनंददाई व रंजकपणे शिकवण्यासाठी उपयुक्त ठरते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कला विषयाला विशेष महत्त्व प्राप्त झालेला आहे. कलाविषयातून खालील उद्दिष्टे साध्य होतात.
1)विद्यार्थ्यांना मुक्त आविष्काराची संधी देऊन सृजनात्मक अभिव्यक्तीतून स्वनिर्मितीचा आनंद देणे.
2)कलानिर्मितीतील तंत्र व साहित्य हाताळण्याचे कौशल्य विकसित करणे.
3)इतर विषयाशी कला विषयाचा सहसंबंध प्रस्थापित करणे.
4)सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे.
5)पर्यावरण विषयक जाणीव जागृती करणे.
5)भारतीय संस्कृती,परंपरा, वारसा यांचा परिचय व संवर्धन करून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे.
6)कलेतील व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे.
7)सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
वरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कला विषयक उपक्रम यशवंत विद्यालयात मोठ्या प्रमाणात राबविले जातात.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त कलेतून खेळातून,पर्यटनातून,प्रात्यक्षिकातून, निर्मितीतून बौद्धिक व मानसिक आनंद मिळावा. कौशल्य मूल्य रुजवावे या हेतूने हस्तकलेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. सदरील उपक्रमात यशवंत विद्यालयातील 55 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून शिवण कलेतील अनुभव प्राप्त केले.
हस्तकलेतील शिवणकाम करताना मुलांना आनंद मिळतो. इतर शिवण कामांमध्ये त्यांच्या अनुभव उपयोगी पडतो. व टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर करण्याचे मूल्य विद्यार्थ्यांच्या अंगी शालेय जीवनात रुजतात. म्हणून असे उपक्रम शाळेत राबवणे अत्यंत गरजेचे आहेत.
रविवार सुट्टीच्या कलावधित सर्जनशील प्रकल्पातून विद्यार्थ्यांनी ‘टाकाऊ कपड्यापासून फळा पुसण्यासाठी डस्टर तयार करणे’ या उपक्रमासाठी राज्य पुरस्कार प्राप्त कला शिक्षक महादेव खळुरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
वरील उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव डी.बी.लोहारे गुरुजी,अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगविकर,उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र पैके,उपसचिव डॉ. सुनिताताई चवळे,मुख्याध्यापक गजानन शिंदे,उप मुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी आदिनी कौतुक व अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!