जय हिंद स्पोर्ट क्लब अहमदपूर व लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा…
जय हिंद स्पोर्ट क्लब अहमदपूर व लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा…
अहमदपूर (गोविंद काळे) : दिनांक 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागे हा उद्देश आहे की संपूर्ण जगात एकता , खेळ भावना निर्माण व्हावी.
Jayhind Campus अहमदपूर मध्ये ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा केला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अहमदपूर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमान संतोष जी लोमटे हे उपस्थित होते.
त्याचबरोबर लातूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापक दत्ताभाऊ गलाले, जयहिंद क्रीडा मंडळाचे सचिव प्रशांत माने, आदर्श क्रीडा शिक्षक श्री संतोष जी कदम, श्री भिमराव ( नाना ) कदम, श्री धीरज भंडे, श्री कदम सर, श्री राहुल सर, श्री वैभव Vaibhav Kajjewad व राष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक श्री मोसीन शेख हे यावेळी उपस्थित होते.
प्रमुख अतिथींचा सत्कार जय हिंद क्रीडा मंडळ व तलवारबाजी संघटनेतर्फे करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना प्रमुख अतिथींनी संघटनेची प्रशंसा केली की गेली पंचवीस वर्षं निरंतर तलवारबाजी चे प्रशिक्षण मोफत दिले जाते ते ही सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळेस आणि त्या मुळेच सातासमुद्रा पलिकडे जाऊन खेळाडूंनी पदक प्राप्त केले आहेत. नक्कीच येणाऱ्या काळात येथील खेळाडू ऑलम्पिक पर्यंत मजल मारतील ह्याच शुभेच्छा. खेळा बरोबर स्पर्धा परीक्षेची ही तयारी करण्यासाठी त्यांनी आमच्या खेळाडूंना मार्गदर्शन केले. काही मदत लागल्यास करण्याचे आश्वासन ही दिले.
