महात्मा फुले महाविद्यालयात कविकुलगुरु कालिदास आणि राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
महात्मा फुले महाविद्यालयात कविकुलगुरु कालिदास आणि राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय साहित्याचा प्रगल्भ वारसा जगाला देणारे कविकुलगुरु कालिदास आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना येथील महात्मा फुले महाविद्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक- समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि संस्कृत विभागाच्या संयुक्त विद्यमाने कविकुलगुरु कालिदास आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. दुर्गादास चौधरी यांनी भूषविले. यावेळी संस्कृत विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार, भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. डी.एन. माने यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कवी कालिदास व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच सर्व कर्मचारी व प्राध्यापकांनीही दोन्ही प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार मराठी विभागाचे प्रोफेसर ह. भ. प. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
