यशवंत विद्यालयातील एनसीसी च्या विद्यार्थ्यांचा 100% निकाल
यशवंत विद्यालयातील एनसीसी च्या विद्यार्थ्यांचा 100% निकाल
अहमदपूर (गोविंद काळे) : रक्षा मंत्रालय व भारत सरकार व 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर यांच्यामार्फत जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या एनसीसी ‘ए'(A) प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये यशवंत विद्यालयातील एनसीसी चे सोळा विद्यार्थी परीक्षेत बसले होते.व ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. व शाळेचा एनसीसीचा निकाल 100% लागला आहे.
यशवंत विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) मागील अनेक वर्षापासून अविस्मरणीय काम करत आहे.या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी रिपब्लिक डे परेड दिल्ली येथे सहभाग नोंदवला आहे.राष्ट्र व समाज निर्मितीसाठी एनसीसी चे विद्यार्थी हे कार्य करत असतात.वृक्षारोपण, तिरंगा रॅली,कारगिल शौर्य दिवस,स्वच्छता अभियान असे अनेक उपक्रम राबवले जातात.एकता आणि अनुशासन हा एनसीसीचा मोटो आहे.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकता व शिस्तीची सवय रुजवली जाते.
वरील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे लेफ्टनंट कर्नल वाय बी सिंग, टागोर शिक्षण समितीचे सचिव आदरणीय डी. बी. लोहारे गुरुजी,टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अशोक सांगवीकर साहेब, उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके,उपसचिव डॉ. सुनिताताई चवळे यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक गजनान शिंदे , उपमुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक शिवाजी सूर्यवंशी, रामलिंग तत्तापुरे,इंग्रजी व स्काऊट विभाग प्रमुख अरुण मोरे , सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकुमार पाटील , परीक्षा विभाग प्रमुख सुनिल धनुरे, कला विभाग प्रमुख महादेव खळुरे. क्रीडा विभाग प्रमुख संतोष कदम मुलींचे एन सी सी ऑफिसर एम.टी.आंधळे मॅडम व एनसीसी विभाग प्रमुख व मार्गदर्शक जी.एस.चवंडा यांनी कौतुक व अभिनंदन केले.
