राजर्षी शाहु महाराजांची जयंती साजरी
राजर्षी शाहु महाराजांची जयंती साजरी
मुरुम (प्रतिनीधी) : येथील श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दि.26 जून 2025 रोजी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्राचार्य डॉ संजय अस्वले यांच्या हस्ते राजर्षी शाहु महाराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर एनसीसी विभागाच्या वतीने महाविद्यालयापासून बसस्थानकापर्यंत सामाजिक ऐक्याच्या घोषणा देत रॅली काढण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संजय अस्वले यांनी राजर्षी शाहु महाराजांच्या जीवनाचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे सांगितले. त्यांनी केलेले सार्वजनिक , सामाजिक , शैक्षणिक , बहुजन , अस्पृश्यता , मागास , दुर्बल , महिला , शेतकरी , मजूर, विद्यार्थी यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य घातले. त्यामुळेच आज त्यांची सामाजिक सुधारणावादी दृष्टिकोण दिसुन येतो, आणि त्यांच्याच कार्याची दखल घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणुन साजरा करण्यात येत आहे. हे त्यांच्या कार्याची पावती आहे. असे सांगितले .
यावेळी डॉ विलास इंगळे, डॉ.पद्माकर पिटले,डॉ. विनोद देवरकर, डॉ. अशोक पदमपले, प्रा. शैलेश महामुनी,प्रा. एम डी साळुंखे, प्रा मुरली जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. भरत शेळके यांनी तर आभार डॉ. पी एल सावंत यांनी मानले.या कार्यक्रमाला प्राध्यापक,प्राध्यापिका , शिक्षकेत्तर कर्मचारी ,एनसीसी कॅडेट व विद्यार्थी उपस्थित होते.
