शांतिनिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचा रंगकर्मी प्रतिष्ठान तर्फे सत्कार संपन्न
शांतिनिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचा रंगकर्मी प्रतिष्ठान तर्फे सत्कार संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : येथील लिंकन इंटरनॅशनल स्कूलमध्ये रंगकर्मी प्रतिष्ठान उदगीर तर्फे शांतिनिकेतन विद्यालय कोदळी ता. उदगीर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. तथा माजी मंत्री संजय बनसोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी भरत सातपुते, दिलीप गायकवाड, ॲड. महेश खळगे , नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर , रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिभिषण मद्देवाड, मनोज पुदाले , दत्ता पाटील ,प्रणिता होळसंबरे, विवेक होळसंबरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
शांतिनिकेतन विद्यालय कोदळी येथील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच इयत्ता पाचवीतील स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांचा ही यथोचित असा सन्मान करण्यात आला. इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी अंकिता तानाजी गादगे 92. 60 टक्के घेवून केंद्रातून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली , संध्या दत्ता जाधव 88. 80 %,टक्के घेऊन द्वितीय , शिवानी संभाजी ढोकळे 87% गुण घेऊन तृतीय आल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला .इयत्ता पाचवीतील स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत संकेत बालाजी जाधव याने 220 गुण प्राप्त केल्याबद्दल ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर द्वितीय समर्थ बम्हानंद कांबळे याचाही टॉफी देवून सन्मान करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कुमार भोसले यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित मराठी विषयाचे शिक्षक अजित पाटील हे उपस्थित होते.,साळुंखे,संजय जाधव , सुनील चोपडे , माधव पाटील , राहुल पाटील ,यशवंत बिरादार या सगळ्यांनी या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केलेले आहे.
सर्वच पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, शिक्षिका यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष रामराव शंकरराव भोसले आणि प्रा. आशितोष पाटील गोजेगावकर, सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.
