सरदार वल्लभ भाई पटेल विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

0
सरदार वल्लभ भाई पटेल विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

सरदार वल्लभ भाई पटेल विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

उदगीर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ उदगीर द्वारा संचलित सरदार वल्लभभाई पटेल सेमी इंग्रजी विभागात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी उपस्थित अध्यक्षस्थानी प्रशालेच्या सेमी इंग्रजी विभाग प्रमुख सौ आशा बेंजरगे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहशिक्षिका सौ. भाग्यश्री पाटील, सौ शिल्पा परगे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजा विषयी सखोल माहिती इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु.ज्योती भंडेने सादर केली. अध्यक्षीय समारोपात सौ. आशा बेंजरगे म्हणाल्या की, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती “सामाजिक न्याय” दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. थोर महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांनी अंगीकारले पाहिजेत असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सौ. वृषाला जाधव यांनी मांडले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!