विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करावे : माजी मंत्री आ.संजय बनसोडे
विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करावे : माजी मंत्री आ.संजय बनसोडे
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर हे सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असुन उदगीर शहरात गेल्या अनेक वर्षापासून रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठाणने अनेक विविधांगी सांस्कृतिक उपक्रम राबवले आहेत. अगदी लहानमुलांपासुन ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत रंगकर्मी प्रतिष्ठानने त्यांच्या कलेत रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे. उदगीर ही गुणवंत विद्यार्थ्यांची खाण आहे.
त्यामुळे आजचा विद्यार्थी हा उज्जवल भवितव्य असलेल्या आपल्या देशाचा उद्याचा जबाबदार नागरीक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करावे. असे आवाहन माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी केले.
ते निडेबन येथील लिंकन इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजीत रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजीत गुणवंत विद्यार्थांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी दिलीपकुमार गायकवाड, प्रसिध्द कवी भारत सातपुते, नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, माजी नगरसेवक मनोज पुदाले,
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद जॉनीमियाँ, दत्ता पाटील, प्रणिती होळसंबरे, बाळासाहेब मरलापल्ले, ज्ञानेश्वर बडगे, विवेक होळसंबरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड, प्रा. ज्योतीताई मद्देवाड, उपाध्यक्ष सिध्दार्थ सुर्यवंशी, सचिन शिवशेट्टे, हणमंत केंद्रे, सुनिल हावा, ॲड.महेश मळगे, निता मोरे, वर्षा मुस्कावाड, मनोहर लोहारे, संदीप निडवदे, बाबासाहेब मादळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, रंगकर्मी प्रतिष्ठाणच्या वतीने चित्रकला, निबंध स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा व त्याचबरोबर उदगीरच्या मातीत असलेल्या सुप्त गुणांना रूपेरी पडद्यावर संधी देण्यासाठी आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव घेतले आहेत. याचा फायदा या भागातील विद्यार्थ्यांना होत आहे.
केवळ कला गुणांनाच संधी न देता या प्रतिष्ठानने वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य शिबीर, नेत्रतपासणी शिबीर व सामान्य नागरिकांना नेहमीच मदतीचा हात दिलेला आहे.
पथनाट्य हे रंगकर्मीचे व्यासपीठ मिळवून देणारे खरे केंद्र असुन त्याचीच पावती म्हणून काही दिवसापुर्वीच राज्यपातळीवरील २०२४ चे ‘लोकसंस्कृती साहित्य संमेलन ‘ उत्तम प्रकारे घेण्याचा मान रंगकर्मीने पटकावला असल्याचे ही आ.संजय बनसोडे यांनी सांगितले आहे.यावेळी उदगीर व जळकोटसह सोलापूर, बीड, लातुर येथील गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
