राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले लोकाभिमुख सेवा केंद्राचे आश्वासन!

0
राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले लोकाभिमुख सेवा केंद्राचे आश्वासन!

राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले लोकाभिमुख सेवा केंद्राचे आश्वासन!

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील कॉलेज रोड वरील रेड्डी कॉम्प्लेक्स येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी अजित पवार गटाचे एका भव्य समारंभात नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदीया जिल्ह्याचे पालकमंत्री अहमदपूर- चाकूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की हे कार्यालय केवळ औपचारिक केंद्र न राहता, नागरिकांसाठी एक लोकाभिमुख सेवा केंद्र म्हणून कार्य करेल, असे ठामपणे सांगितले.
पुढे बोलताना नामदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, “हे जनसंपर्क कार्यालय केवळ माहिती आदानप्रदान करण्याचे ठिकाण नसेल, तर ते नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी समर्पित असेल.” नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, आवश्यक दाखले मिळवणे तसेच विविध प्रकारच्या तक्रारी नोंदवण्यासाठी या कार्यालयाचा मोठा उपयोग होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी माहिती केंद्र, तक्रार निवारण कक्ष, विशेष मार्गदर्शन सत्रे इत्यादी सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच, डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त वापर करून नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर दिला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या शुभहस्ते या राष्ट्रवादी क्रॉग्रेस पार्टी जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख होते. व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव काळे, नगराध्यक्ष करीम गुळवे, माजी उपनगराध्यक्ष मुजिब पटेल, एडवोकेट टी एन कांबळे, राम नरवटे, इलियास सय्यद , माजी नगरसेवक विविध विभागाचे पदाधिकारी ,प्रतिष्ठीत नागरिक , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या स्थापनेबद्दल आनंद व्यक्त केला आणि हे कार्यालय खऱ्या अर्थाने जनतेसाठी “जनतेचे द्वार” बनेल अशी आशा व्यक्त केली.
हे जनसंपर्क कार्यालय नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम ठरेल आणि शासन व नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करेल, असा विश्वास यावेळी भाषणाच्या शेवटी व्यक्त करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!