श्रेया आयएएस परीक्षेत यशवंत विद्यालयाचे भरीव यश

0
श्रेया आयएएस परीक्षेत यशवंत विद्यालयाचे भरीव यश

श्रेया आयएएस परीक्षेत यशवंत विद्यालयाचे भरीव यश

अहमदपूर (गोविंद काळे) : श्रेया आयएएस इंटेलिजन्स स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता तपासली जाते.महाराष्ट्रातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे आयोजन करून स्पर्धात्मक परीक्षेची भीती कमी करण्याचा येथे प्रयत्न केला जातो. या बौद्धिक स्पर्धा परीक्षेत यशवंत विद्यालयाने भरीव यश संपादन केले आहे.
परीक्षेचा अभ्यासक्रम शाळेच्या अभ्यासक्रमावर आधारित असून
श्रेया आयएएस (Shreya IAS Exam) परीक्षेतून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयार केले जाते.
परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ज्ञान वाढवते.
सदरील परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करते आणि त्यांना अभ्यासासाठी प्रेरित करते.
या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार केले जाते. यात यशवंत विद्यालय अहमदपूर येथून कु.श्रुती बाबुराव कांबळे हिने राज्यात सातवा व जिल्ह्यात प्रथम,
कु.अक्षरा महालिंग मठपती राज्यात नववा क्रमांक व जिल्ह्यात द्वितीय,कु
अंजली धनाजी गुट्टे राज्यात बारावा जिल्ह्यात चौथा,चैतन्य पांडुरंग उगिले राज्यात पंधरावा जिल्ह्यात पाचवा,
प्रणव नामदेव बिलापट्टे राज्यात पंधरावा जिल्ह्यात पाचवा,
श्रवण रणजीत चौधरी राज्यात सोळावा जिल्ह्यात सहावा,कु.
आनंदी किरण मुसने राज्यात सोळावा जिल्ह्यात सहावा कु़.समिक्षा बालाजी तुडमे राज्यात सतरावा जिल्ह्यात सातवा,श्लोक लक्ष्मण ब्यागलवार जिल्ह्यात आठवा कु.अपर्णा सतीश हलकुडे जिल्ह्यात नववा,नबील अनवर सय्यद जिल्ह्यात दहावा,कु.अरुंधती अजित कुलकर्णी जिल्ह्याचा अकरावा,कु.दुर्गा पंडित जायभाये जिल्ह्यात बारावा, कु.पूर्वी प्रमोद दिक्कतवार जिल्ह्यात तेरावा या पद्धतीने भरीव यश संपादन केले आहे.
वरील भरीव याच्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर,संस्थेचे सचिव डी बी लोहारे गुरुजी,उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र पैके,सहसचिव डॉ. सुनिता चवळे,प्राचार्य गजानन शिंदे, उपमुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे, शिवाजी सुर्यवंशी, विषय शिक्षक
कपिल बिरादार,संतोष पारशेट्टे,धनंजय तोकले, सौ.पुष्पा साकोळे,राघवेंद्र बोरोळे,बापुराव कांबळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!