संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

0
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाचे पाचवीचे 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.
सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्राचार्या रेखाताई हाके-तरडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे , नगरपरिषदेचे चे मुख्य अधिकारी संतोष लोमटे, केंद्रप्रमुख सफियोदिन कासार, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी दयानंद मठपती, महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर सह मान्यवरांची उपस्थिती होती.
श्रेयश अमोल देशमुख हा विद्यार्थी 264 गुण घेऊन जिल्ह्यात द्वितीय आला आहे. अभिजीत चाटे, हर्षदा हांडे, आदिश्री ताटीपामुलवार, पियुष मुंढे, श्रावस्ती ससाने,पार्थ बोंडग, सुदर्शन घोगरे, चैतन्य पांचाळ, पार्थ किरडे ,राजवीर मुंढे, युवराज वलसे, अल्तमश शेख, वीरा गुदळे ,आदित्य झरीकुंटे, अमृता जवणे,अरिहंत पांचाळ,अवधूत नारागुडे, वैष्णवी ढाकणे, तेजल आलापुरे, आरोही बेंबडे, साई केसगीरे हे 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असन हा जिल्ह्यातील सर्वाधिक निकाल आहे‌.
गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धा परीक्षेचे महत्त्व सांगितले. स्पर्धात्मक परीक्षा विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक आहेत. प्राथमिक स्तरापासूनच स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी घेतली पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे,विस्तार अधिकारी मठपती, केंद्रप्रमुख साफियोदिन कासार, यांचे मनोगतपर भाषणं झाली.अध्यक्षीय समारोप रेखाताई हाके-तरडे यांनी केला.
यावेळी स्कॉलरशिप परीक्षा,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, एम. टी. एस.ई , श्रेया.आय.ए.एस ,ज्युनिअर आय.ए.एस अशा विविध स्पर्धा परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पहार देऊन पालकांसह सत्कार करण्यात आला.
या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून एकूण 3,30,000 रु. शिष्यवृत्ती मिळणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन शारदा तिरुके यांनी तर आभार सतीश साबणे यांनी मानले.
यशस्वी विद्यार्थ्यांना सहशिक्षिका त्रिगुणा मोरगे, सविता पाटील, सविता करंडे,शारदा तिरूके, प्राजक्ता भोसले, शबाना शेख, मीना होनराव, सरिता मुसने,अश्विनी घोगरे,सतीश साबणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!