बीआयएस स्टॅंडर्ड क्लब यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांने केला सुरज ऍग्रो पाईप्स कंपनीचा अभ्यास दौरा

0
बीआयएस स्टॅंडर्ड क्लब यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांने केला सुरज ऍग्रो पाईप्स कंपनीचा अभ्यास दौरा

बीआयएस स्टॅंडर्ड क्लब यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांने केला सुरज ऍग्रो पाईप्स कंपनीचा अभ्यास दौरा

पीव्हीसी पाईपच्या कारखान्यास यशवंतच्या बी आय एस स्टॅंडर्ड क्लबच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय मानक ब्युरो( BIS) स्टँडर्ड क्लबच्या वतीने यशवंत विद्यालयाच्या
विद्यार्थ्यांनी सुरज ऍग्रो पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड एमआयडीसी लातूर येथे सुप्रीम गोल्ड पीव्हीसी पाईप च्या कारखान्याला भेट देऊन पीव्हीसी पाईप कशाप्रकारे तयार होतात याबद्दल सविस्तर माहिती पूर्ण अभ्यास दौरा केला.
भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) ही भारत सरकारची एक संस्था आहे जी वस्तूंचे मानकीकरण, चिन्हांकन आणि गुणवत्ता प्रमाणनासाठी काम करते. ही संस्था देशात वस्तूंच्या मानकांची पातळी राखते आणि आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते.वस्तूंचे मानकीकरण, चिन्हांकन आणि गुणवत्ता प्रमाणन यासाठी कार्यरत आहे.आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेमध्ये BIS भारताचे प्रतिनिधित्व करत असून वस्तू आणि सेवांसाठी मानके विकसित करणे. मानक चिन्हे वापरण्यासाठी परवाने देणे. वस्तू आणि सेवांची तपासणी करणे आणि गुणवत्ता प्रमाणित करणे.
लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे. बीआयएसचे कार्य आहे.

 “विद्यार्थी हे सशक्त, सृजनशील आणि गतिमान भारताचे शिल्पकार आहेत. भारतीय मानक ब्युरो (BIS) देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मानक क्लबची स्थापना करून या प्रकारच्या दूरदर्शी उपक्रमाद्वारे भारताचे भविष्य उज्ज्वल बनवत आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच  गुणवत्ता, मानके, बी आय एस चे कार्य,वस्तूंचे गुणवत्ता यांचा अभ्यास शालेय जीवनात विद्यार्थ्यांना होतो. हॉलमार्कचे सोन्याचे दागिने असतील किंवा आयएसओ मार्कचे विविध वस्तू किंवा आर मार्कचे इलेक्ट्रॉनिक्स चे साहित्य असतील याची पारख कशी करावी याचे सखोल ज्ञान BIS क्लबच्या विद्यार्थ्यांना नक्कीच समजेल.आणि हेच विद्यार्थी कुटुंबात, समाजात जनजागृती करतील अशी अपेक्षा आहे. हीच बी आय क्लब चे मुख्य उद्देश आहे.
   यावेळी स्टॅंडर्ड क्लब विद्यालयाचे समन्वयक महादेव खळुरे, सहशिक्षिका श्रीमती प्रतीभा सोलपुरे मॅडम,यांनी क्लबच्या 20 विद्यार्थींना सोबत घेऊन लातूर येथे  बी आय एस क्लबचे प्रमोशन ऑफिसर हर्षमोहन शुक्ला यांच्या मार्गदर्शनाने साधनव्यक्ती

महादेव खंडागळे सरांनी दि. 4 जुलै रोजी ॲडिशनल एमआयडीसी लातूर येथील पीव्हीसी पाईप कारखान्याच्या अभ्यास देवरा घडवून आणला. पीव्हीसी पाईप तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल, पीव्हीसी पाईप साठी लागणारे केमिकल्स, पाईपचे आकार, कारखान्यातील लॅब, लागणारे सर्व साहित्य, उपलब्ध बाजारपेठ, याबाबत सखोल माहिती दिली, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना कारखान्यातील मॅनेजरने उत्तरे दिली. विद्यार्थ्यांना सर्व उपयुक्त पाईपचे एलबोज,क्लिप, पाईपचे साईज, पाईपचे प्रकार याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
वरील उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव डी.बी.लोहारे गुरुजी,अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगविकर,उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र पैके,उपसचिव डॉ. सुनिताताई चवळे,मुख्याध्यापक गजानन शिंदे,उप मुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी शिक्षक व शिक्षक कत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!