रिक्षाचालकावर विनयभंग आणि बाल संरक्षण कायद्यांतर्गत (पोस्को) गुन्हा दाखल

0
रिक्षाचालकावर विनयभंग आणि बाल संरक्षण कायद्यांतर्गत (पोस्को) गुन्हा दाखल

रिक्षाचालकावर विनयभंग आणि बाल संरक्षण कायद्यांतर्गत (पोस्को) गुन्हा दाखल

अहमदपूर (गोविंद काळे) : येथे एका धक्कादायक घटनेत, एका रिक्षाचालकावर 17 वर्षीय कॉलेजच्या मुलीला बळजबरीने आपल्या ॲटोमध्ये बसवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को (POCSO) अंतर्गत अहमदपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार, दि14 जुलै 2025 रोजी घडली.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कॉलेज मधुन दि 14 जुलै रोजी दुपारी घरी परतत असताना, रिक्षाचालकाने तिला बस स्थानक अहमदपूर येथे अडवले आणि ‘बळजबरीने ॲटोमध्ये बस’ असे म्हणत तिच्या उजव्या हाताला धरून ओढले. मुलीने प्रतिकार करत हाताला झटका देऊन बस स्थानकात गावाकडे जाण्यासाठी बस आल्याचे पाहुन पळत जाऊन बस मध्ये बसुन गावाकडे निघुन गेली यावेळी रिक्षाचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
पिडीत मुलीने घरी गेल्यानंतर तात्काळ आपल्या पालकांना याची माहिती दिली. पालकांनी त्वरित अहमदपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पिडित 17 वर्षीय मुलीच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, आरोपी सुधीर वाघमारे रा अहमदपूर या रिक्षाचालकाविरुद्ध गुरन नं 502/2025 कलम 74 व सह कलम 8,12 (विनयभंग) आणि पोस्को (POCSO ) कायद्याच्या संबंधित कलमांखाली दि 14 जुलै रोजी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, आरोपी रिक्षाचालकाला तात्काळ अटक केली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक बि.डी भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष केदासे हे करीत आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!