सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे यांची प्रशिक्षणार्थी डि.वाय.एस.पी धनराज देवर्जनकर यांच्या घरी सदिच्छा भेट

0
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे यांची प्रशिक्षणार्थी डि.वाय.एस.पी धनराज देवर्जनकर यांच्या घरी सदिच्छा भेट

सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे यांची प्रशिक्षणार्थी डि.वाय.एस.पी धनराज देवर्जनकर यांच्या घरी सदिच्छा भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील केदारे यांनी नुकतीच प्रशिक्षणार्थी डि.वाय.एस.पी धनराज देवर्जनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ही भेट पोलीस दलातील वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांमधील सौहार्दपूर्ण संबंध आणि मार्गदर्शनाचे उत्तम उदाहरण म्हणून पाहिली जात आहे.
या भेटीदरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे यांनी प्रशिक्षणार्थी डि.वाय.एस.पी धनराज देवर्जनकर यांच्याशी पोलीस दलातील विविध पैलूंवर चर्चा केली. पोलीस सेवेतील आव्हाने, अनुभव आणि भविष्यातील वाटचाल यावर दोघांमध्ये मोकळी चर्चा झाली. केदासे यांनी देवर्जनकर यांना त्यांच्या प्रशिक्षण आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच पोलीस दलात प्रभावीपणे काम करण्यासाठी मोलाचे सल्लेही दिले.
प्रशिक्षणार्थी डि.वाय.एस.पी धनराज देवर्जनकर यांनीही संतोष केदासे यांचा सपत्नीक कुटुंबासह सत्कार करून भेटीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अशा भेटींमुळे नवोदित अधिकाऱ्यांना प्रेरणा मिळते आणि अनुभवी अधिकाऱ्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ घेता येतो, असे मत देवर्जनकर यांनी व्यक्त केले.
ही सदिच्छा भेट पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक संबंध वाढवण्यास मदत करते, असे मत यावेळी पत्रकार गोविंद काळे यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रशिक्षणार्थी उप- विभागीय अधिकारी देवर्जनकर यांच्या पत्नी नेहा देवर्जनकर आई मंगल देवर्जनकर, मेव्हणे विकास बोरगावकर, बहीण सरस्वती बोरगावकर , प्रा. दिलीप भालेराव पत्रकार गोविंद काळे आदींची उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!