महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल कल्याण पाटील यांचा सत्कार संपन्न

उदगीर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव पदी उदगीर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांची निवड झाल्याबद्दल श्रीकांत पाटील यांच्या विकास नगर येथील जनसंपर्क कार्यालयात सत्कार सोहळा साजरा करण्यात आला.
याप्रसंगी नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष शिवराज पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मंजूर पठाण, माजी नगरसेवक समसोद्दीन जरगर, माजी नगरसेवक महेबूब शेख, माजी पंचायत समिती सदस्य बबन धनबा,लक्ष्मण बतले,राष्ट्रीय सेवा दलाचे अध्यक्ष अजित शिंदे, ॲड. पद्माकर उगिले, जळकोट बाजार समितीचे संचालक आशिष पाटील राजूरकर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे शहर अध्यक्ष अजीम दायमी,महिला कॉंग्रेसच्या बालिकाताई मुळे, प्रा. गोविंद भालेराव,प्रा.सतीश क्षीरसागर,प्रा. संजय चन्नावार, प्रा.कल्याण बिरादार, शरद खोंडे, संदीप चिखले,महेश नवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय शेटकार, युवक शहराध्यक्ष आदर्श पिंपरे, फय्याज डांगे, परमेश्वर अडगूलवार, गणेश पाटील, निलेश अंतेवाड,संतोष सूर्यवंशी, गोविंद उदगीरे, एम.आर शेख,योगेश शेरीकर, श्रीकांत बिरादार,राजू गूरमे, तसेच श्रीकांत पाटील मित्रमंडळाचे अध्यक्ष सचिन वाघमारे, विजय भोसले, अक्षय सोनकांबळे, प्रशांत हुडगे, प्रवीण पटवारी, राजेंद्र सुगावे,पवन सुर्यवंशी, मंगेश येरकुंडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर,कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.गोविंद भालेराव यांनी केले.
