वाढवणा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी !!दोन तासात शोधून काढली पाणबुडी मोटार ची चोरी !!

0

उदगीर (ॲड. एल पी उगिले) घर फिरले की घराचे वासे फिरतात असे म्हणतात, अगदी त्याच पद्धतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली झाली. नूतन पोलीस अधीक्षक म्हणून अमोल तांबे, त्यांच्या जोडीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून मंगेश चव्हाण हे रुजू झाले आणि लातूर जिल्ह्याची विस्कटलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी पुन्हा सुरळी चालू होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुन्हे शोध मोहिमेसोबतच गुन्ह्यांच्या तपासावर देखील भर देण्यात आला आहे. परिणामतः सर्वच पोलीस स्टेशन अलर्ट मोडवर आले आहेत. त्याला उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस स्टेशन तरी अपवाद कसे राहील ? याही पोलीस स्टेशनला नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड रुजू झाल्याने त्यांनी देखील विस्कटलेली घडी सुरळीत केली आहे. वाढवणा पोलीस स्टेशन येथे 27 जुलै रोजी भानुदास कोंडीबा वाघलगावे राहणार राजनवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर यांच्या शेत गट क्रमांक 18 /05 मध्ये असलेल्या विहिरीत शेतीला पाणी देण्यासाठी पाच एच.पी. ची सी आर आय कंपनीची पाणबुडी मोटर जी ची किंमत 25 हजार रुपये आहे, तशी चांगली मोटार सोडलेली होती. ती संध्याकाळी सात ते रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती अशी फिर्याद भानुदास कोंडीबा वाघलगावे यांनी दिल्यावरून वाढवणा पोलीस स्टेशन येथे 214/ 25 कलम 303 (2) 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करून गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय दळवी पाटील यांच्याकडे देण्यात आला होता.
अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असताना शेतकऱ्याची 25 हजार रुपये किमतीची पाणबुडी मोटार चोरली गेली या गोष्टीचे गांभीर्य डोळ्यासमोर ठेवून तातडीने तपास करण्याच्या उद्देशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी सहाय्यक फौजदार अंतराळ केंद्रे पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके पोलीस हेडकॉन्स्टेबल बळदे पोलीस नायक संजय कलकत्ते यांचे पथक नेमून सदरील गुन्ह्यातील मुद्देमालाचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केले. तातडीने हे पथक तपासावर रवाना झाले अधिकारी व मलदार यांनी आपल्या हद्दीत ग्रस्त वाढवून गोपनीय माहिती काढून गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या दोन तासात आरोपी विठ्ठल विश्वनाथ कोरे वय 35 वर्ष आणि दत्ता मोतीराम नंदगावे वय 45 वर्ष राहणार राचनावाडी तालुका चाकूर यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले सदरील गुन्हा करण्यासाठी या आरोपींनी चोरीची मोटार सायकल बजाज डिस्कवर एम एच 24 डब्ल्यू ७६७१ ही मोटार सायकल वापरली होती सदरील मोटार सायकल या गुन्ह्यातील फरार आरोपी तुकाराम ईश्वर आवळे यांनी लातूर येथून चोरी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले याच मोटार सायकलच्या चोरीच्या संदर्भाने लातूर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे 612 25 कलम 303 2 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दोन्ही गुन्ह्याची उकल वाढवणा पोलिसांनी करून या प्रकरणातील चोरी गेलेला मुद्देमाल पाणबुडी मोटार किंमत पंचवीस हजार रुपये तसेच लातूर येथून चोरी गेलेली वापरात असलेली डिस्कवर मोटरसायकल किंमत चाळीस हजार रुपये असा एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अमूल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले, सपोनि सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके सहाय्यक फौजदार अंतरम केंद्रे पोलीस नायक संजय दळवी पाटील संजय कलकत्ते यांच्या विशेष पथकाने केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नायक संजय दळवी पाटील हे करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!