शिरूर-ताजबंद बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महीलेची पर्स कापून 40 हजारांचे मंगळसूत्र लंपास!

0

अहमदपूर ( गोविंद काळे) – तालुक्यातील शिरूर-ताजबंद बसस्थानकावर शुक्रवारी सायंकाळी 05:00 वाजण्याच्या सुमारास बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्समधून 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना घडली असुन दि 1 ऑगष्ट रोजी अहमदपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जनाबाई शंकर आंदे या महिला शुक्रवारी सायंकाळी 5 : 00 वाजता आपल्या मुलासोबत लातूरला जाणाऱ्या बसमध्ये शिरूर ताजबंद बस स्थानकावरून चढत होत्या. बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्सची चैन उघडून आतमध्ये ठेवलेले सुमारे 1 तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले. या मंगळसूत्राची अंदाजे किंमत 40 हजार रुपये आहे.
चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.
जनाबाई शंकर आंदे रा लातुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता बि.एन.एस 2023 कलम 303 ( 2 ) नुसार दि 1 ऑगष्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, लवकरच चोरट्याचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
या घटनेमुळे बसस्थानकावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!