राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या प्रदेश संघटन महामंत्रीपदी डॉ. शरदकुमार तेलगाने यांची निवड झाल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार

0
राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या प्रदेश संघटन महामंत्रीपदी डॉ. शरदकुमार तेलगाने यांची निवड झाल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) येथील ख्यातनाम असलेल्या ओम हॉस्पिटल आणि मॅटरनिटी होमचे प्रमुख संचालक व राष्ट्रीय मोदी सेवा समिती चे तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असलेले डॉ.शरदकुमार तेलगाने त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय सेवा समीतेने डॉ. शरदकुमार तेलगाने यांची प्रदेश संघटन महामंत्रीपदी निवड केली आहे.
डॉ. शरदकुमार तेलगाने हे सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करतात. प्रबोधनात्मक कीर्तनकार म्हणून ग्रामीण भागात ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या कामाची गती आणि समाजसेवेची आवड व प्रचंड जनसंपर्क असल्या मुळे त्यांची संघटन बांधणीची क्षमता मोठी आहे. अशा पद्धतीच्या व्यक्तीला व्यापक स्वरूपाचे काम द्यावे, म्हणून राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे महामंत्री बालाजी नारायण सूर्यवंशी,किशोर लखन यांनी उदगीर येथे भेट देऊन प्रत्यक्षात करीत असलेल्या कामाचा लेखाजोखा पाहूण डॉ.शरदकुमार तेलगाने यांची प्रदेश संघटक महामंत्री पदावर नियुक्ती करण्यात केली आहे. ही नियुक्ती झाल्याबद्दल संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्यकारणीच्या वतीने डॉ. शरदकुमार तेलगाने यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. .यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष व पत्रकार राजकुमार माने ,संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष व पत्रकार उत्तम फड ,जिल्हा सचिव मोहनेश्वर विश्वकर्मा, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब चिंचोलकर, बीजेपी किसान मोर्चाचे धोंडीबा तेलंगपुरे, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे हे उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. तेलगाणे म्हणाले की, उदगीर पंचक्रोशीतील जनतेचे प्रेम आणि सहकार्य त्याच्या बळावरच आपला जनसंपर्क वाढला आहे. पक्षशष्ठींनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे. ती केवळ उदगीर पंचक्रोशीतील लोकांच्या प्रेमापोटी स्वीकारलेली आहे. सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार लोक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत आहे. मात्र दुर्दैवाने काही ठिकाणी खऱ्या लाभार्थ्यापर्यंत या योजना पोहोचत नाहीत, परिणामतः शासनाची सकारात्मक भूमिका असून देखील जन माणसांना शासनाची भूमिका आणि लोकांसाठी काय केले हे योग्य पद्धतीने माहिती न झाल्याने विरोधकांना अपप्रचार करायला संधी मिळते. हे थांबले पाहिजे, यासाठी आपण आणि आपले पूर्ण सहकारी आता दुप्पट जोमाने कामाला लागले आहेत. एवढ्या प्रेमाने माझे कौतुक करून आपण माझा सत्कार आणि स्वागत केलात, शुभेच्छा दिलात. त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. लोककल्याणकारी योजनांच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपण सहकार्य करावे. असे आवाहनही डॉ. शरद कुमार तेलगाणे यांनी या प्रसंगी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!