धीरज देशमुख यांचा सत्कार संपन्न
उदगीर (प्रतिनिधी)
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी आमदार धिरजभैय्या देशमुख यांना दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन द्वारा दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दलचा राज्यस्तरीय कै. बाळासाहेब घुईखेडकर उदयोन्मुख तरुण सहकारी कार्यकर्ता हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका लक्ष्मीताई भोसले व उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती प्रीतीताई चंद्रशेखर भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील कित्येक सहकारी बँका डबघाईला आलेल्या असताना सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र आपला आदर्श महाराष्ट्रासाठी निर्माण करून ठेवला आहे. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवा चेअरमन धीरज देशमुख हे देखील बँकेच्या प्रगतीमध्ये योगदान देत आहेत. त्यांच्या एकूण कामकाजाचा लेखाजोखा पाहून हा पुरस्कार दिला गेला आहे. त्याबद्दल त्यांना हा सत्कार मिळाला आहे.
