अहमदपूरमध्ये दीडशे साधकांनी घेतला आनंदाचा अनुभव!सहा दिवसांचे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ शिबिर यशस्वीरित्या संपन्न
अहमदपूर( गोविंद काळे ) येथील संत सावता माळी मंगल कार्यालयात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ शाखेच्या वतीने आयोजित ‘आनंद उत्सव’ शिबिर नुकतेच संपन्न झाले. सहा दिवस चाललेल्या या शिबिरात दीडशेहून अधिक साधकांनी सहभाग घेतला. या शिबिरात दररोज तीन तास सुदर्शन क्रिया, योगासने आणि प्राणायाम यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांमध्ये चाललेल्या या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांनी शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी आवश्यक असलेले तंत्र शिकून घेतले. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे तज्ज्ञ प्रशिक्षक लक्ष्मण भंडारी आणि नानासाहेब शिंदे यांनी साधकांना शास्त्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शन केले.
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोक शारीरिक आणि मानसिक व्याधींनी त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत हे शिबिर त्यांना ताण-तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या शिबिराला यशस्वी करण्यासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या अहमदपूर शाखेचे स्वयंसेवक भरत इगे, पुष्पाताई दोडके, अमोल फुलारी, संतोष मद्देवाड, महेश लोहारे, वसंत माळी, विकास राठोड, विश्वनाथ वीळेगावे, सांगवीकर सर, बाभुळगावे सर, आदींनी विशेष परिश्रम घेतले.
