जगाला संताचे विचारच वाचवू शकतात – ह.भ.प. महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री

0
जगाला संताचे विचारच वाचवू शकतात - ह.भ.प. महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री

शिवरत्न पुरस्कार वितरण व गुणगैरव सोहळा एक अविस्मरणीय समारंभ संपन्न

लातूर (प्रतिनिधी) – जगद्गुरू तुकोबाराय त्या काळातील खरे पत्रकार होते. तुकोबारायांनी ज्या विषयाला स्पर्श केला त्या विषयाचा अभ्यास आज सर्व धर्मातील तत्त्ववेता आजपण करत आहेत. त्यांनी सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या लिखाणातून क्रांती घडली असे प्रतिपादन शिवरत्न पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी अध्यक्षीय भाषणात ह.भ.प. महंब महादेव महाराज बोराडे शास्त्री म्हणाले. यावेळी उद्घाटक माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, कळंब धाराशिवचे आ. कैलास घाडगे पाटील, माजी महापौर दिपक सुळ, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना देशमुख, जेष्ठ पत्रकार रघुनाथ बनसोडे, संपादक भारत जाधव विचार मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना महाराज म्हणाले की, लिखान करणार्‍याचे काम खुप मोलाचे असते म्हणूनच ज्या वेळी संताच्या विचाराने तरुण कर्म करू लागतील त्यावेळी ते विचार जगापुढे आदर्श ठरू लागतात. असे कर्म छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवले आहेत म्हणूनच जगाला संताचे विचारच वाचवु शकतात असे प्रतिपादन ह.भ.प. महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांनी आपल्या भाषणात केले.

यावेळी विनायराव पाटील म्हणाले की, या देशात लोकशाही आहे का असा प्रश्न पडत आहे सध्या न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न केला तरच लोकशाही वाचू शकणार आहोत या लोकशाहीत लोकांनी विचार करणे गरजेचे आहे असे म्हणाले. आ कैलास घाडगे पाटील म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातून लातूरची निर्मिती झाली एका तालुक्याचा जिल्हा होतो आणि विकासात सर्वात पुढे जातो. विलासराव साहेबांचे नेतृत्व तुम्हाला लाभले, त्यामुळेच मोठा भाऊ मागे राहिला अन् लहान भाऊ पुढे गेला असे ते यावेळी म्हणाले.

दिपक सुळ म्हणाले की, बारा वर्षे पत्रकारिता क्षेत्रात टिकून राहणे सोपे नाही, पत्रकारितेच्या लेखणीची ताकद खूप मोठी आहे. आ. कैलास घाडगे पाटील जसे निष्ठावंत कार्यकर्ता होऊ शकतात तसाच मी पण अमितभैय्याचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे असे आपल्या अभ्यासु भाषणात म्हणाले.
राज्यात सत्ताधार्‍यांनी विरोधी पक्ष शिल्लक ठेवला नाही ती भूमिका छावा संघटनेला बाहेरून पार पाडावी लागते व माझ्यावर हल्ला झाला लातूरसह राज्यात तीव्र निषेध नोंदवला परंतु लोकशाही मानणारे आम्ही अण्णासाहेबांचे छावे आहोत असे परखड मत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी यावेळी मांडले. प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडून न्याय देण्याची भूमिका या वृत्तपत्राने पार पाडली आहे यापुढेही रोखठोक भूमिका घेऊन आपण वाटचाल करावी अशी अपेक्षा करतो असे जेष्ठ पत्रकार रघुनाथ बनसोडे म्हणाले. पुरस्कारर्थीकडून सुधाकर तेलंग अध्यक्ष लातूर विभागीय शिक्षण मंडळ यांनी आपले विचार मांडले.
या शिवरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यास गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने व दिपप्रज्वलन करून सुरूवात झाली. तसेच जनतेच्या हक्काचं लातूर मिशन या गिताचा अनावरण सोहळा मान्यवराच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सौ. रेशमा गंभीरे सरपंच सिकंदरपूर, सुधाकर तेलंग अध्यक्ष लातूर विभागीय शिक्षण मंडळ, इसरार सगरे चेअरमन लातूर मल्टीस्टेट को. सोसायटी, डॉ. प्रो. आनंद पवार अधिष्ठाता कै. बी.व्ह. काळे आयुर्वेद महाविद्यालय, समाधान सुर्यवंशी क्षेत्रीय अधिकारी मनपा लातूर, सुनिल लाडके मंडळ अधिकारी बाभळगाव, ओमप्रकाश पवार उद्योजक मुरूड, दत्तात्रय परळकर संपादक समृद्ध व्यापार, सामना ढोल ताशा पथक लातूर यांना या वर्षीचा शिवरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच विशेष सत्कार सुरेश काचबावार, डॉ. बालाजी वाघमारे, प्रा. तानाजी घुटे, कुमार भालेराव, गीतकार राजन सरवदे यांचा करण्यात आला. यावेळी अनाथ व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला महिला वर्गासह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक भारत जाधन यंानी केले तर सुत्रसंचलक बालाजी कांबळे यांनी केले शेवटी आभार दिपक बोराडे पाटील यांनी मानले.

यावेळी माधव गंभीरे, संतोष दगडे, दिपक नरवडे उपसंपादक परमेश्‍वर घुटे, जिल्हा प्रतिनिधी गणेश स्वामी, सल्लागार – गणेश होळे, सादिक शेख, कैलास साळुंके, श्रीराम गायकवाड, दयानंद माने, ईश्‍वर बद्दर, शंकर जाधव, अमित तिकटे, कैलास ढोले, गोविंद जगताप, मनोज चव्हाण, विष्णु शिंदे, महेश राठोड, उमेश भिसे, ज्ञानेश्‍वर सुर्यवंशी, तुकाराम जोगदंड, अनिल शेळके, केदार वांगसकर, संतोष मगर, लखन सावंत, अजित माने, आदित्य जाधव, यश दुटाळ, महालिंग तटाळे, दयानंद स्वामी ढवळे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!