उदगीर दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयात रॅगिंगविरोधी दिन व सप्ताह उत्साहात साजरा

0
उदगीर दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयात रॅगिंगविरोधी दिन व सप्ताह उत्साहात साजरा

उदगीर (प्रतिनिधी) येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयात रॅगिंगविरोधी दिन व सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी कायद्यांविषयी जागरूकता निर्माण करून मैत्रीपूर्ण वातावरणाची जोपासना करणे हा होता.
सप्ताहाचा शुभारंभ रॅगिंगविरोधी कार्यशाळेने झाला. या वेळी महाविद्यालयीन शिक्षण विभाग प्रमुख व कार्यक्रम आयोजक डॉ. श्रीकांत कल्याणकर यांनी सप्ताहाच्या उपक्रमांची माहिती देत रॅगिंगमुक्त वातावरणाचे महत्त्व स्पष्ट केले. उद्घाटन प्रसंगी प्रा. डॉ. एम.आर. पाटील, सहयोगी अधिष्ठाता, यांनी रॅगिंगचे मानसिक व शैक्षणिक परिणाम अधोरेखित करून विद्यार्थ्यांना नवागतांचे स्वागत स्नेहपूर्वक करण्याचे आवाहन केले. प्राध्यापकांनीदेखील मार्गदर्शन करत रॅगिंगविरोधी कायद्यांबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच महाविद्यालयात रॅगिंगविरोधी समितीचे गठन करण्यात आले.
सप्ताहाचा भाग म्हणून कनिष्ठ व वरिष्ठ विद्यार्थ्यांनी एकत्रित फोटो घेण्यासाठी विशेष सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला, ज्यामुळे एकता व आपुलकी वृद्धिंगत झाली. याशिवाय प्रश्नमंजुषा, लोगो डिझाइन, पोस्टर बनविणे आणि निबंध लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना युजीसी, नवी दिल्ली आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत सहभागासाठी देखील मार्गदर्शन मिळाले.
सर्व स्पर्धक व विजेत्यांना प्रमाणपत्रे देऊन सहयोगी अधिष्ठाता डॉ. एम.आर. पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप डॉ. हेमंत गावंडे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!