वाढवणा येथे गोवंशाची कत्तल, गुन्हा दाखल

0

उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर तालुक्यातील मौजे वाढवणा येथील खाटीक गल्लीमध्ये गोवंश कत्तल केली जात असल्याची माहिती पोलिसांना लागल्याबरोबर वाढवणा पोलिसांनी हस्तक्षेप करत त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली, आणि आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार संजय दळवे पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाढवणा पोलीस स्टेशन येथे गुरन 240 /25 कलम 5,5 (क), 9 (अ) महाराष्ट्र प्राणी (पशु) संरक्षण अधिनियम 1976 (सुधारित कायदा 1995) सह कलम 3 (5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये आरोपी मेहताब कुरेशी, फैयाज उर्फ लड्डू चांदपाशा कुरेशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून हाती आलेली माहिती अशी की, या गुन्ह्यातील आरोपींनी एक पांढऱ्या रंगाचा गोवंश जातीच्या बैलास वेदना होतील अशा क्रूर पद्धतीने वागणूक देऊन बेकायदेशीररित्या मांस विक्री करण्याच्या उद्देशाने कत्तल केलेली व कत्तलीच्या साहित्यासह आरोपी मिळून आल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हालसे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी अंदाजे 350 किलो वजनाचे मांस प्रति किलो 220 रुपये प्रमाणे 77 हजार रुपये तसेच लोखंडी सुरा दहा, फिकट गुलाबी रंगाचा मस्कोला, लाकडी दांडा असलेल्या तीन कुर्‍हाडी, 22 फूट लांबीची जाड सोल असा मुद्देमाल ही घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!