सुप्तपणे जपलेल्या आठवणी म्हणजे लपवलेल्या काचा – डॉ. दिपाली कुलकर्णी

सुप्तपणे जपलेल्या आठवणी म्हणजे लपवलेल्या काचा - डॉ. दिपाली कुलकर्णी

उदगीर [प्रतिनिधी]  : जीवन जगत असताना बऱ्याच घटनांच्या आठवणी  प्रकटपणे मांडल्या जात नसल्या तरी त्या अत्यंत आपुलकीने जपल्या जातात. अशा सुप्तपणे जपलेल्या आठवणींचा ठेवा म्हणजेच लपवलेल्या काचा होत. असे मत डॉ. दिपाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले

   चला कवितेच्या बनात या साहित्यिक, सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीअंतर्गत उदगीर येथील दूध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या २४७ व्या वाचक संवादाचे पुष्प डॉ. दिपाली संजय कुलकर्णी यांनी डॉ सलील कुलकर्णी यांच्या लपवलेल्या काचा या पुस्तकावर संवाद साधून गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुचिता कदम या होत्या. यावेळी डॉ. दिपाली कुलकर्णी म्हणाल्या की, कुणीतरी ढकलतं म्हणून चालत राहणं आणि कुणी मारत नाही म्हणून जगतं राहणं यापेक्षा जुन्या गोड कडू आठवणींना सोबत घेऊन आनंदी जीवन जगणं महत्वाचे ठरते.

     यानंतर झालेल्या चर्चेत डॉ. माधवी जाधव, डॉ. शिवाजीराव सोनटक्के, प्रा. गोपाळ पाटील, प्राचार्य डॉ. नामदेव खंडगावे, प्रा. गौरव जेवळीकर,शांता गिरबने आदींसह अनेकांनी सहभाग नोंदवला. उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली. मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.शेवटी सुचिता कदम यांनी साजेसा अध्यक्षीय समारोप केला, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबूराव सोमवंशी, प्रा.राजपाल पाटील,योगेश स्वामी व अनंत कदम यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन कु. प्रतिक्षा लोहकरे हिने केले तर आभार प्राचार्य डॉ नामदेव खंडगावे यांनी मानले. यावेळी डॉ. संजय कुलकर्णी, सुनिता दंडवते, सुनील चिकटवार, आनंद चिंचोळे आदिंसह अनेकांची उपस्थिती होती.

About The Author