लाईफ केअर येथे कॅन्सर रुग्णासाठी लवकरच समुपदेशनासह निदान , उपचार शस्त्रक्रिया
उदगीर ( प्रतिनिधी ) : कार्किनोज हेल्थ केअर च्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील रुग्णासाठी लाईफ केअर हॉस्पिटल येथे सर्व कॅन्सर निदान , उपचार आणि शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले .
लाईफ केअर हॉस्पिटल येथे ता.१९ गुरुवारी डॉ. अर्चानाताई पाटील चाकूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
कॅन्सर म्हणजे मृत्यू हा विचार बदलण्या करिता कॅन्सर रुग्णांसाठी तज्ञ डॉक्टर मार्फत टेलिफोन द्वारे मोफत समुपदेशन करण्यात येणार आहे . आपल्या गावातच निदान ,उपचार आणि शस्त्रक्रिया द्वारे वेळेवर उपचार करून नागरिकांच्या मनात कॅन्सर बद्दल असलेली भीती दूर करण्यात येणार असल्याचे डॉ अर्चना पाटील चाकूरकर यांनी सांगितले . कॅन्सर पूर्व तपासणी सुविधा द्वारे महिलांना भविष्यात होवू शकणाऱ्या कॅन्सर बद्दलचे निदान करण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे . प्राथमिक अवस्थेतील कॅन्सर बाबत माहिती मिळाली तर रुग्णावर तातडीने उपचार करून रुग्णाला कॅन्सर मुक्त होणे शक्य होणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले .
यावेळी कार्किनोज हेल्थ केअर च्या सी ओ ओ सुप्रिया राव यांनी ग्रामीण भागात वाढत असलेल्या कॅन्सर बाबत चिंता व्यक्त केली . यासाठी प्रत्येक गावात कॅन्सर रुग्णासाठी शिबिर घेणार असल्याचे श्रीमती राव यांनी सांगितले .
नजीकच्या काळात रेडिएशन व पेट सी टी या सुविधेसह कॅन्सर रुग्णावर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना , प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ,याशिवाय समाज सेवा संस्थाचा मदतीने पात्र रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले .
यावेळी मिलिंद घनपाठी , डॉ. दत्ता पवार , डॉ. पी के देशमुख , डॉ. अमोल गायकवाड , डॉ. निखिल गोरे , अनुराग पंढरपूरकर उपस्थित होते .