सैनिकी विद्यालयातील नागेश मोतिरावे याचे निबंध स्पर्धेत यश

सैनिकी विद्यालयातील नागेश मोतिरावे याचे निबंध स्पर्धेत यश

उदगीर ( प्रतिनिधी ) : श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयातील नागेश मोतिरावे या विद्यार्थ्यांने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत यश संपादन केले आहे.नागराळ येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे राज्यमंत्री संजयजी बनसोडे व प्रसिद्ध अभिनेते तथा सह्याद्री देवराई प्रतिष्ठानचे प्रमुख सयाजीराव शिंदे यांच्या हस्ते नागेश मोतिरावे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, ब्लड बँकचे अध्यक्ष रमेशअण्णा अंबरखाने, माजी समाजकल्याण आयुक्त दिनेश सास्तूरकर , माजी जि. प. सदस्य दिलीप पाटील नागराळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत सैनिकी विद्यालयाचा नागेश मोतिरावे या विद्यार्थ्यांला उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले आहे. निबंधाचा विषय होता, वृक्ष संवर्धन काळाची गरज. या स्पर्धेत एकुण २६६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

निबंध स्पर्धेत नागेश मोतिरावे याने यश प्राप्त केल्याबद्दल त्याचे व त्याला मार्गदर्शन करणारे सहशिक्षक बालाजी मुस्कावाड, प्रल्हाद येवरीकर , बालाजी कांबळे, सौ. अंबिका पारसेवार यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणसंस्था उदगीर, दिलीप पाटील नागराळकर, चंदन पाटील नागराळकर, कमांडंट कमांडर बी. के. सिंह,प्राचार्य वसंत कुलकर्णी, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विभाग प्रमुख सीमा मेहत्रे , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

About The Author