निबंध स्पर्धेत हावगीस्वामीच्या नम्रता सूर्यवंशीला उत्तेजनार्थ पारितोषिक

निबंध स्पर्धेत हावगीस्वामीच्या नम्रता सूर्यवंशीला उत्तेजनार्थ पारितोषिक

उदगीर (प्रतिनिधी ) : उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्यावतीने हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयीन गटातून श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतील कु.नम्रता शिवराज सूर्यवंशी या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. ‘ वृक्ष आणि मानवी जीवन ‘ या विषयावर त्यांनी निबंध लिहिला होता. प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप होते. सदरील स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयातील संतोषी तेलंगे, ऐश्वर्या सूर्यवंशी इत्यादी चार ते पाच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे, सचिव उमेश पाटील देवणीकर, सहसचिव प्रभूराज कपीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे,प्र.प्राचार्य डॉ.एस.डी.लोहारे, उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, पर्यवेक्षक प्रा.डी.एस.मुंदडा, डॉ.म.ई.तंगावार तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

About The Author