मातृभूमी महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

मातृभूमी महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

उदगीर ( प्रतिनिधी ) : उदगीर” येथील मातृभूमी महाविद्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले . मातृभूमी महाविद्यालयात मागील तेरा वर्षापासून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते . विद्यार्थ्यांना स्वातंत्र वीरांचे बलीदान स्मरण व्हावे व रक्तदानाचे महत्व कळावे.यासाठी मातृभूमी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मातृभूमु नर्सिंग स्कूल ,कस्तूराबाई नर्सिंग स्कूलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते . शिबीराचे उद्घाटन प्रदीप पत्तेवार यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे ,डॉक्टर रवी पाटील ,अविनाश कुलकर्णी ,संजय राठोड, सुधीर पाटील, अविनाश मानकीकर, ओमकार कुलकर्णी, प्राचार्य उषा कुलकर्णी, प्रा. रामदास मलवाडे , मनोज गुरूडे, कल्याण धनुरे ,संतोष सुर्वे आदी उपस्थित होते. यावेळी अंबरखाने ब्लड बँकेचे डॉक्टर बी एम शेटकार, सोमनाथ स्वामी, योगेश गोदाजी, स्वाती स्वामी ,विनायक टवळे, सर्वेश स्वामी यांची उपस्थिती होती . रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा . बिभीषन मद्देवाड, प्रा. उस्ताद सय्यद, प्रा. रणजीत मोरे, ग्रंथपाल उषा कुलकर्णी, प्रा. भगवान नर्सिकर, प्रा. फूलनदेवी किवंडे ,अनिल गायकवाड, नंदकिशोर बयास ,अपेक्षा पत्तेवार, धोंडीराम जोशी ,विजयकुमार पाटील, मुबारक पटेल, दयानंद टाके, विवेक देवर्से, देवा डोंगरे आदींनी प्रयत्न केले.

About The Author