ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे पेटकर कुटुंबीयांच्या घरात जाते पाणी
सांडपाण्याच्या नालीचे व्यवस्थापन झाले नसल्यामुळे पाऊसाचे गावात वाहणारे पाणी घरात जाऊन नुकसान होते.
औराद शहा.ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हजार असलेले कळवा आणि 1000 रू.मिळवा अशी परस्थिती आहे.
औराद शहाजानी (भगवान जाधव) : येथील अभिनव कॉलनी मध्ये नाल्यांचे व्यवस्थापन व्यवस्थित झाले नसल्यामुळे संपुर्ण परीसरातील गल्लींचे पाऊसाचे पाणी पेटकर भगवान यांच्या घरामध्ये घुसून नुकसान ही गेल्या दोन वर्षापासुन होत आहे. याविषयी त्यांनी रीतसर ग्रामपंचायत कार्यालयाकडे पत्र देऊन नालींचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने करण्याची मागणी केलेली असूनही ग्रामपंचायत कार्यालयाचे सदरील कामाकडे कुठेही लक्ष नसल्याचे दिसून येते.
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मार्केट यार्ड व लिंगायत गल्ली येथुन येणारे पाणी हे पेटकर भगवान यांच्या घराजवळील नाली या बुजाल्यामुळे आणी कांही लोकांनी पुढील नालीवर केलेल्या अतिक्रमणामुळे गावाचे सांडपाणी साचत आहे आणी पाऊस पडला की ते पाऊसामुळे आलेले संपूर्ण परीसरातील पाणी हे पेटकर यांच्या घरात घुसत आहे आणी घरातील जिवनावश्यक वस्तुंचे नुकसान होत आहे. त्यामुळे पेटकर यांनी वारंवार ग्रामपंचायत सदस्यांना भेटून काम करण्यासाठी विनंत्या केल्या पण काहीच होत नाही म्हणुन शेवटी ग्रामसेवक यांना नाली काम करण्यासाठी आणी पुढे अडवलेली नाली खोदुन पुन्हा सुरु करावी व होणारी नुकसान थांबविण्यासाठी अर्ज दिले पण ग्रामसेवक धनाजी धनासुरे यांनी नेहमिप्रमाणे दिलेल्या अर्जावर कसलीच कार्यवाही केल्याचे दिसुन येत नाही.