खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या अहमदपूर तालुक्यातील विविध गावांना भेटी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील अनेक गावामध्ये पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे व जमिनीचे नुकसान झाले असल्याने त्यांची पाहणी करण्यासाठी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकर श्रृंगारे अहमदपुर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. खासदार सुधाकर श्रृंगारे यांचे अहमदपूर शहरात आगमन होताच अहमदपूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.मिनाक्षीताई रेड्डी यांच्या निवासस्थानी भेट दिली असता खासदार सुधाकर श्रृंगारे यांचा यथोचित सत्कार रेड्डी परीवाराच्या वतीने करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील, प्रदेश पॅनलिस्ट सदस्य गणेश दादा हाके, माजी सभापती आर.डी.शेळके, उपसभापती अशोकराव चिंते, अमित रेड्डी, ज्ञानोबा बडगिरे, राजकुमार खंदाडे, रामभाऊ बेल्लाळे, गोविंद गिरी, राहुल शिवपुजे, निखिल कासनाळे, बालाजी सारोळे, शिवराज पाटील, शिवानंद भोसले, देविदास सुरणर, हणमंत देवकते, बालाजी होळकर, हेमंत गुट्टे, संग्राम नरवटे, शिवाजी देवकते, राजकुमार नरवटे,आदिसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील मानखेड येथे पुराने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून दलीत वस्ती मधील पुरामुळे झालेल्या नुकसानीचाही आढावा घेऊन तात्काळ पंचनामे करून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी
यावेळी मानखेड येथील ग्रामस्थांना आश्वासन दिले. याबरोबरच चिखली गावावर ढग फुटी झाल्याने तलाव फुटून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने त्यांचाही आढावा चिखली ग्रामस्थांकडून घेऊन तात्काळ पंचनामे करून मदत मिळवून देण्याचेही आश्वासन चिखली येथील शेतकऱ्यांना दिले.