ओ. बी.सी. समाजाचे रद्द झालेले आरक्षण सन्मानाने परत मिळावे
आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत कोणत्याच निवडणुका होणार नाहीत याची आघाडी सरकारने दक्षता घ्यावी
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर तालुका भाजपच्या वतीने ओबीसी समाजाचे आरक्षण सन्मानाने परत मिळावे आणि जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्यात येऊ नयेत या मागणीस खालील असंतोष व्यक्त करून निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या “दुर्लक्षामुळे” ओबीसी आरक्षण गेले आहे. राज्य सरकारने न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही, इंपेरिकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही केली नाही, नियुक्ती केलेल्या मागासवर्गीय आयोगाला निधी देण्यात आले नाही. त्यामुळे ओबीसींच्या हक्काचे आरक्षण आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गेले आहे. महाराष्ट्रातील सरकारने राज्यातील तमाम ओबीसी वर्गावर हा जाणीवपूर्वक अन्याय केला आहे आणि आता महाराष्ट्रात आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे ठरविले आहे. आशा पध्दतीने ओबीसी वर्गाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम हे सरकार करीत आहे. जो पर्यंत ओबीसींच्या हक्काचे आरक्षण सन्मानाने परत मिळत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी आज दि. १५.०९.२०२१ रोजी तहसीलदार अहमदपूर यांचे मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले आहे.
याप्रसंगी निवेदन देत असताना मा. गणेशदादा हाके प्रदेश प्रवक्ते भाजपा, मा. विनायकरावजी पाटील प्रदेश उपाध्यक्ष भाजपा, श्रीमती रेखाताई तरडे महिला जिल्हा अध्यक्षा, मा. त्र्यंबक आबा गुट्टे जिल्हा सरचिटणीस भाजपा, मा. प्रा. हणमंतराव देवकत्ते सर तालुकाध्यक्ष भाजपा अहमदपूर, मा. गोविंदजी कांडनगिरे ओबीसी तालुकाध्यक्ष, मा. हेमंतरावजी गुट्टे ओबीसी प्रदेश सचिव, मा. बाळासाहेबजी होळकर, सरचिटणीस मा. दत्तात्रय जमालपुरे, मा. प्रताप पाटील, मा. बालाजी गुट्टे पं. स. उपसभापती, कुलदीप हाके, कमलाकर पाटील, माणिक नरवटे, अर्जुन गंगथडे, गोरे रघुनाथ, संतोष गोरे, प्रशांत जाभाडे, श्याम यादव शहराध्यक्ष, मुंढे माधव युवा तालुकाध्यक्ष, रमेश कांबळे अनुसूचित जाती जमाती तालुकाध्यक्ष, राजीव खंदाडे, सौ. गयाबाई सिरसाट, अँडो. सोमनाथ फूले, अँडो. सुरनर व इतर मान्यवर उपस्थित होते.