गोदाकाठाला गोदावरी नदी पात्राबाहेर पाणी
नांदूरमध्येश्वर मधून २६हजार क्यू से वेगाने विसर्ग सुरू
चांदोरी (रोहित टोंपे) : इगतपुरी व त्रंबकेश्वर भागात मागील दोन व तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने गंगापूर व दारणा धरणातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी नदी च्या पाण्याचा पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे व नदी नदी किनारी असलेल्या शेतात पाणी शिरल्याने अनेक पिके पाण्याखाली गेली आहे.
गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असताना नांदूरमध्येश्वर धरणातून विसर्ग वाढवून तो मंगळवारी (ता १४) २६ हजार क्यू से इतका करण्यात आला आहे. चांदोरी येथील गोदापात्रातील हेमाडपंथी मंदिरे पाण्याखाली गेली असून नदी किनारी असलेल्या खंडेराव महाराज मंदिरात व मंदिर परिसर पाण्याने व्यापला आहे.
चांदोरी येथील खंडेराव महाराज मंदिर व नदी घाट पाण्याखाली गेल्याने नागरिकांना जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला.
नदी परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये साठी चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समिती चे स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहे. व तसेच वेळोवेळी धरणातून होणाऱ्या निसर्गाची माहिती पोहचवण्याचे काम तलाठी सत्यम चौधरी व आपत्ती व्यवस्थापन समिती चे स्वयंसेवक करत आहे.
प्रतिक्रिया
जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सूचना सामाजिक माध्यमातून संभाव्य पूररेषेत असलेल्या नागरिकांन पर्यंत पोहचवत असून , नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सावधेनतेचा इशारा देण्यात आला आहे.