श्यामलाल संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी करणारा अर्ज फेटाळला

श्यामलाल संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी करणारा अर्ज फेटाळला

 उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील शामलाल स्मारक शिक्षण संस्था, दक्षिण भारतातील आर्यसमाजी विचारधारा घेऊन चालणारी सर्वात मोठी संस्था आहे. या संस्थेच्या अनुषंगाने संस्था अंतर्गत पदाधिकारी, सदस्य त्यांच्यामध्ये असलेल्या मतभेदातून या संस्थेवर प्रशासक नियुक्त करावा आणि पुन्हा निवडणुका घ्याव्यात. अशा आशयाचा अर्ज सोपानराव तोंडचिरकर, अर्जुनराव सोमवंशी, रामचंद्र येरमे, सुजाता मदनसुरे, मनमथ आप्पा चिल्ले, रावसाहेब वैद्य व इतरांनी सह धर्मादाय आयुक्त लातूर यांच्याकडे सादर केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन सह धर्मादाय आयुक्त बि.डी. कुलकर्णी यांनी दिनांक 16 सप्टेंबर 20 21 रोजी प्रशासकीय कार्यवाही करण्यासंबंधीचा अर्ज फेटाळून लावला आणि या वादाला पूर्णविराम दिला आहे.

 या अनुषंगाने सविस्तर कारणमीमांसा करून संस्थेच्या यापूर्वी झालेल्या निवडणुका व त्याचे प्रलंबित असलेले बदल अर्ज पाहता संस्थेवर प्रशासक नेमणे उचित होणार नाही, तसेच संस्थेच्या अनेकदा निवडणुका झाल्या असल्याकारणाने आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकांचा बदला अर्जाचा दाखला देत संस्थेच्या कारभारात प्रशासक नेमण्या सारखा कसलाच दाखला प्रस्तुत अर्जामध्ये नाही. त्यामुळे अर्जदाराची विनंती अमान्य करण्यात येते. आणि प्रलंबित असलेले बदल अर्ज निकाली काढण्यासाठी संबंधितांस निर्देश देऊन हा प्रशासक नेमण्याचा अर्ज फेटाळून लावला आहे.

 अनेक वर्षांपासून संस्थेच्या निवडणुकांच्या संबंधाने तसेच इतर या ना त्या कारणाने न्यायालयामध्ये उपरोक्त अर्जदारा कडून अनेक प्रकरणे दाखल करण्यात आलेली होती. मात्र जिल्हा सह आयुक्त यांच्या सविस्तर निर्णयाने संस्थेतील वाद संपुष्टात येऊन संस्था शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा अधिक जोमाने भरारी घेईल. अशी अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष अॅड.सुपोषपाणि आर्य यांनी व्यक्त केली आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये पदा संबंधीचे वाद न करता शिक्षण संस्थेच्या उदात्त हेतू आणि उद्देश यांचा विचार करून इतर सर्व सदस्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नाव असलेल्या शामलाल शिक्षण संस्थेला अधिक गतिमान करण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन अध्यक्ष एडवोकेट सुपौषपाणि  आर्य यांनी केले आहे.

About The Author