भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्या जिल्हा संघटकपदी हनिफभाई शेख

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्या जिल्हा संघटकपदी हनिफभाई शेख

लातुर (प्रतिनिधी) : अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्या लातूर जिल्हा संघटकपदी हनिफभाई शेख यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल अहमदपूरकरांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पद्मश्री अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे लातूर जिल्हा संघटक म्हणून अण्णा हजारे यांनी हनिफभाई शेख यांची निवड केली. राळेगणसिद्धि येथे त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी संजय पठाडे, अजय खेडकर, अलाऊद्दीन शेख, अशोक सब्बन यांची उपस्थिती होती. सन २००१ पासुन हनिफ शेख अण्णा हजारे यांच्यासोबत असुन अण्णांनी लोकहितासाठी केलेल्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जिल्ह्यातील लोकहिताचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. हनिफ शेख यांच्या निवडीबद्दल अहमदपूर येथील थोडगा रोड येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जीवनराव बोंडगे, बासिदखान पठाण, युवा नेते पद्माकर कांबळे, विजय शेटकार, प्रा.गणेश मदने, दत्ता शिंदे,माधव स्वामी, शेख गफ्फार, तुकाराम लोकरे,शेख खय्युम, राजु शेख, जंगले आदींची उपस्थिती होती.

चौकट

अण्णा हजारे यांनी २००१पासुन जनहितासाठी केलेले आंदोलन व मला तालुका व जिल्ह्याअंतर्गत आंदोलन करण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मिळुन जबाबदारी योग्यरित्या पार पाडली.आताही दिलेली जबाबदारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्यरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे.अण्णांसोबत राज्यात लोकायुक्तसाठीचे पुढचे आंदोलन असणार आहे,असे मत हनिफ शेख यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.

About The Author