चालक दिनानिमित्त लालपरीच्या चालक – वाहकांचा सत्कार

चालक दिनानिमित्त लालपरीच्या चालक - वाहकांचा सत्कार

शेतकरी व नागरिकांकडून कृतज्ञता

रेणापूर (प्रतिनिधी) : एसटी बस अर्थात लालपरी ही ग्रामीण भागाची जीवनदायिनी आहे हे लक्षात घेत तालुक्यातील मोटेगाव येथे चालक दिनाचे औचित्य साधून एसटी बसचे पूजन करण्यात आले.बसचे चालक व वाहक यांचा सत्कारही करण्यात आला. परिवहन क्षेत्रात चालकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एसटी हे वाहन ग्रामीण भागासाठी जीवनदायिनी म्हणून अनेक वर्षांपासून धावत आहे.विविध अडचणींचा सामना करत बसचे चालक व वाहक ग्रामीण भागाला सेवा पुरवण्याचे काम करत असतात.हे लक्षात घेत चालक दिनानिमित्त मोटेगाव येथे एसटी बसचे पूजन करण्यात आले.बसचे चालक ज्ञानेश्वर कांबळे व वाहक पेंडकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सरपंच मुसळे, दशरथ सोमवंशी व मान्यवरांच्या हस्ते चालक-वाहकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कैलास मोरे, साहेबराव पाटील,गोविंदबापू सोमवंशी,मुसळे आबा, हणमंत पाटील, रघु कसबे, गोपाळ पवार,मोहन पवार, सुभाष सोमवंशी, संपत सोळुंके, गणेश सोमवंशी, राहुल सोळुंके,ईश्वर शिंदे, ज्ञानदीप पवार, भैय्या सोळुंके, मधुकर पवार, गोविंद राऊत, अनिल पतंगे, बाळू कटारे, शरद सोळुंके, वैजनाथ जाधव, परमेश्वर सोळुंके, विकास पवार, ज्ञानदीप पवार, मैनु शेख, महादू पवार, बाबुराव मुसळे, पांडू सोळुंके, अमोल जगताप यांच्यासह ग्रा.पं.चे कर्मचारी भगवान शिंदे व सुशेन जाधब यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

About The Author