पंतप्रधान मोदीजींच्या जन्मदिनी वृद्धाश्रमात
लातूर (प्रतिनिधी) : जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना ब्लँकेटचे वाटप आणि महिला स्वच्छता कर्मचार्यांचा साडी-चोळी देऊन गौरव करण्यात आला.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जगाच्या पाठीवर सर्वाधिक लोकप्रिय असलेले पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पाहिले जाते त्यांनी देशातील शेतकर्यांसह, गोरगरीब, दिनदलित सर्वसामान्य जनतेच्या हिताचे शेतकरी सन्मान योजना, उज्वला गॅस, घरकुल आवास, कोरोनाच्या संकट काळात मोफत राशन यासह अनेक निर्णय घेवून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कश्मीर मधील ३१७ हे कलम, तीन तलाक, राम मंदिर आदी वर्षानूवर्षे खितपत पडलेले प्रश्न निकाली काढले. त्यामूळे संपूर्ण देश आज मा. नरेंद्रजी मोदी यांच्याकडे एका वेगळ्या आशेने पाहतो.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस सेवा सप्ताहाच्या माध्यमातून साजरा केला जात असून या निमित्ताने लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने लातूर येथिल मातोश्री वृद्धाश्रमातील ५३ आजी-आजोबांना ब्लँकेटचे वाटप भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते करण्यात आले. वृद्धाश्रमातील प्रत्येक आजी-आजोबात माझे आजी-आजोबा दिसतात आशा भावना व्यक्त करून या वृद्धाश्रमातील कोणत्याही अडचणी सोडण्यासाठी आपण तत्पर आहोत असे यावेळी आ. रमेशअप्पा कराड यांनी बोलून दाखविले.
मातोश्री वृद्धाश्रमातील कर्मचारी वयोवृद्ध अन्नपुर्णा लादे या वृद्धाश्रमात राहतात गेल्या ६ वर्षापासून त्यांनी केवळ झाड पाल्यावरच आपलं जीवन जगत आहेत. त्यांना मिळणारे वृद्धाश्रमातील महिना ७-८ हजार रुपयाचे मानधन वर्षाआखेर दिवाळी पाडव्याला वृद्धाश्रमालाच देणगी देतात. यावर्षी त्यांनी राममंदिर उभारणीसाठी ५० हजार रुपयाची देणगी दिल्याबद्दल त्यांचा आ. कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची पार्श्वभूमी वृद्धाश्रमातील आजोबा प्रा. भरत चव्हाण यांनी प्रारंभी दिली.
गेल्या दिड दोन वर्षापासून कोरोनाचे भयावह संकट असतानाही रुग्णालय परिसर सतत स्वच्छ रहावा यासाठी कार्यरत असणार्या महिला स्वच्छता कर्मचार्यांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते साडी-चोळी देवून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास भाजपाच्या बुध्दिजिवी प्रकोष्ठ सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय क्षिरसागर, भाजपा ओबीसी आघाडीचे संपर्क प्रमुख डॉ. बाबासाहेब घुले, रेणापूर पसचे उपसभापती अनंत चव्हाण, भाजपाचे दिलीप धोत्रे, जिल्हा उपाध्यक्ष वसंत करमुडे, वृद्धाश्रमातील वयस्त सहजीवन प्रकल्पाचे प्रमुख नवनाथ मद्दे, व्यवस्थापक नरसिंग कासले, उद्योजक जगदिश कुलकर्णी, रमाकांत फुलारी, शालीक गोडभरले यांच्या अनेकजण होते.