प्रवीण शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सचिव पदी वैशालीताई पाटील यांची निवड
लातूर (प्रतिनिधी) : प्रवीण शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित रवींद्रनाथ टागोर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पाखरसांगवी या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री भगवानराव पाटील यांनी वैशालीताई पाटील यांची संस्थेच्या सचिव पदी नुकतीच सर्वानुमते निवड केली. जिजाऊ लेक, वन कन्या, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात गाढा अभ्यास असलेल्या पाटील ताई यांची या पदावर नियुक्ती करणे म्हणजे त्या पदाला योग्य न्याय देणे होय. आज रोजी श्री रवींद्रनाथ टागोर माध्यमिक व प्राथमिक विद्यालय येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून वैशालीताई पाटील यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा ताई पाटील, सोनवणे सर, पाटे सर, एन के सर, पठाण सर, राठोड सर ,सय्यद सर मलवाड सर, कांबळे सर, व मुजावर सर हे उपस्थित होते. व सर्व शिक्षकांनी मॅडमचं कौतुक व अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस आणि भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.