लातूर येथील सहकार भवनास स्व. अजितदादा पवार यांचे नाव द्यावे – भरत चामले

0
लातूर येथील सहकार भवनास स्व. अजितदादा पवार यांचे नाव द्यावे - भरत चामले

लातूर (एल पी उगीले) लातूर येथील सहकार भवनास “स्व. अजितदादा पवार सहकार भवन, लातूर” असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव तथा उदगीर येथील स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले ,सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
भरत चामले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लातूर येथील सहकार भवन हे जिल्ह्यातील सहकार चळवळीचे महत्त्वाचे केंद्र आहे. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी स्व. अजितदादा पवार यांनी केलेले कार्य, सहकारी संस्थांना दिलेले मार्गदर्शन तसेच सहकार चळवळीच्या बळकटीसाठी दिलेले मोलाचे योगदान लक्षात घेता, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून लातूर येथील सहकार भवनास “स्व. अजितदादा पवार सहकार भवन, लातूर” असे नाव देण्यात यावे, जेणेकरून नव्या पिढीला अजितदादा च्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करता येईल. तसेच सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना एक नवी ऊर्जा प्राप्त होईल. असेही भरत चांगले यांनी सांगितले आहे.
या मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक शासन निर्णय घ्यावा, अशी विनंती भरत चामले यांनी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली आहे. या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याची कायमस्वरूपी आठवण जपली जाईल, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी निवेदन सादर करताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बबन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!