शिवसेना महिला आघाडी संघटन मजबूत करणार – माजी आ. सुधाकर भालेराव

0
शिवसेना महिला आघाडी संघटन मजबूत करणार - माजी आ. सुधाकर भालेराव

उदगीर (एल पी उगीले) शिवसेना लातूर जिल्हा आणि उदगीर तालुका यांच्या वतीने शिवसेना संघटन बांधणीच्या दृष्टीने माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महिला आघाडीला प्राधान्य देऊन महिला संघटन उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना महिला आघाडी संपर्कप्रमुख सौ रंजनाताई कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार सुधाकर भालेराव, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या प्रमुख उपस्थितीत उदगीर विधानसभेतील महिला आघाडी ची महत्वाची बैठक संपन्न झाली,यात शिवसेना महिला आघाडी च्या गावं तिथे शाखा बांधणी,पद नियुक्त्या,बचत गट, या सदर्भामध्ये सविस्तर चर्चा व मार्गदर्शन झाले तसेच विविध पदासाठी मुलाखती झाल्या,यावेळी शिल्पा इंगळे, ॲड. रवीप्रभा खादीवाले,कांता सूर्यवंशी, सुनीता पंचाक्षरी,दिपा कोंगे,रमाबाई वाघमारे सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष,स्वाती कांबळे,अरुणा बेळकोने,गुंजन पिंपळे,मेघा जाधव,लातूर वरून आलेले प्रीती कोळी सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष, ॲड. रेखा भोसले,दिशा देशमुख उपजिल्हाप्रमुख,डॉ विलास राठोड ओबीसी जिल्हाअध्यक्ष, संदीप कुलकर्णी उपजिल्हाप्रमुख,अनिल पंचाक्षरी विधानसभा प्रमुख,व्यंकट कसबे सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष,मनोज पाटील तालुकाप्रमुख,सतीश कांबळे सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष,शहरप्रमुख लखन कांबळे,शहरप्रमुख अमेर शेख,सुखदेव गुंमणर ओबीसी जिल्हा संघटक,व्यंकट पटवारी,माधव पटवारी उपतालुका प्रमुख,आनंद भोसले,मारोती गायकवाड,मारोती साळुंखे,अरबाज शेख आदी प्रमुख पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
याप्रसंगी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी स्पष्ट केले की, केवळ मेळाव्या पुरत्याच महिला उपस्थित न राहता प्रत्यक्ष कार्यक्रम राबवत असताना त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना दिवसेंदिवस वाढत आहे. आता लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला बळकटी द्यायची असेल तर महिला आघाडी बळकट झाली पाहिजे. घराघरातून शिवसैनिक निर्माण करायचा असेल तर त्यासाठी महिला आघाडी सक्षम होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आपली वाटचाल चालू असून महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्याचा नवीन पॅटर्न आपण उभा करू, अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!