लातूर जिल्ह्यात शिंदे सेनेला धक्का, उबाटामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर येथील युवा नेते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्नील अण्णा जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उदगीर तालुक्यातील अनेक महिला आणि तरुणांनी शिवसेना शिंदे गटातून पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
यामध्ये प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख म्हणून नावाजलेले व्यक्तिमत्व असलेल्या आणि झुंजार नेत्या अरुणाताई लेंडाने, निर्मला मठपती, सरोजा बिरादार, मंगलाताई घागरे, नंदिनी द्वपायन, कल्पनाताई कुलकर्णी यांचा समावेश आहे.
तसेच अनिता गायकवाड, अनुराधा अंधारे, कृपा सूर्यवंशी, मुस्तफा शेख, हाश्मी वाहेद यांचा समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्नील अण्णा जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या महिला आघाडीने मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या पक्षप्रवेश प्रसंगी उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल अण्णा जाधव यांच्या समवेत उदगीर येथील समन्वयक व्यंकट साबणे, शहर संघटक मंगेश एरकुंडे, माजी शहराध्यक्ष शिवकांत चटनाळे, मुस्ताफ शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उदगीर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सामाजिक जाणीवा जपत लोक कल्याणकारी योजना प्रत्यक्ष राबवून लाभार्थ्यांना फायदा मिळवून दिला जात असल्याने ग्रामीण भागातील तरुण आणि महिला मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आकर्षित होत आहेत. जेव्हापासून उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी स्वप्नील यांना जाधव यांनी स्वीकारली आहे, तेव्हापासून शिंदे गटाच्या शिवसेनेला सतत खंडार पडत आहे. शिंदे गटातून अनेक महिला आणि तरुण पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. ही या पक्षाच्या दृष्टीने सकारात्मक वाटचाल म्हणावी लागेल, अशी चर्चा राजकीय जाणकार बोलत आहे.
