सेल्फी विथ रांगोळी स्पर्धेचे आयोजन

सेल्फी विथ रांगोळी स्पर्धेचे आयोजन

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम

अहमदपूर (गोविंद काळे) : सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आँनलाईन ‘सेल्फी विथ रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे.सौंदर्याचा साक्षात्कार व मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे.या स्पर्धेत कुठलीही फीस न घेता निशुल्क रांगोळी स्पर्धेत सहभाग घेता येईल. सहभागी स्पर्धकांनी नियम व अटी चे वाचन आणि पालन करणे आवश्यक असून ती स्पर्धकाला बंधनकारक राहतील. रांगोळी सेल्फी फोटो पाठवून देत असताना स्वतःचे पूर्ण नाव, वर्ग,शाळा, जिल्हा अशी माहिती फोटो सोबत पाठवून द्यावे.एका नंबर वरून एकच रांगोळी स्वीकारले जाईल. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र व्हाट्स ॲप वर पाठवण्यात येईल. स्पर्धकाने त्या प्रमाणपत्राची रंगीत प्रिंट काढून घ्यावी. स्पर्धकांनी दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ९ वाजेपर्यंत रांगोळी पाठवून द्यावे.वेळेवर आलेल्या रांगोळीचाच स्पर्धेसाठी विचार केला जाईल.उशिरा येणाऱ्या व अपूर्ण माहिती देणाऱ्या रांगोळीचा स्पर्धेमध्ये विचार केला जाणार नाही.

रांगोळी स्पर्धेचे नियम व अटी – ही स्पर्धा दोन गटात आहे.पहिला गट १ली ते ७ वी व दुसरा गट ८ वी ते १२ वी असे दोन गट आहेत.स्पर्धकांनी रांगोळीमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करावा.ही रांगोळी स्पर्धा ऑनलाइन आहे. रांगोळी कुठल्याही प्रकारची चालेल साईझचे बंधन नाही.परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.रांगोळीचा एक सेल्फी फोटो व संपूर्ण रांगोळीचा एक फोटो या ८७९६६६५५५५ नंबर वर पाठवावा.’सेल्फी विथ रांगोळी’ स्पर्धेत जास्तीत जास्त कला प्रेमिंनी सहभागी व्हावे असे आवाहन सचिव महादेव खळुरे यांनी केले.

About The Author