तपसेचिंचोली येथील खंडोबा यात्रा चंपाषष्ठी महोत्सव साधेपणाने साजरी
औसा (प्रतिनिधी) : औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे रूढी परंपरेनुसार खंडोबा यात्रा चंपाषष्ठी महोत्सव उत्साहात पार पडला. यात्रा महोत्सवादरम्यान 4 डिसेंबर रोजी लोकरंग टीम लातूर, 5 डिसेंबर अनुराधा गोरे हासेगाव, स्वाती क्षीरसागर, 6 डिसेंबर रोजी महादेव मस्के बाभळगावकर यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला. 7 डिसेंबर रोजी खंडू वाघे राजुरीकर तर 8 डिसेंबर रोजी दत्तू वाघे हडोळी यांचा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम पार पडला.
सांगतेच्या दिवशी दि. 9 तारखेला मारुती रखमाजी नेटके, राजेश मनोहर पाटील, यांच्या हस्ते श्री ची पूजा करून आरती सबिना सोहळ्याला सुरुवात करण्यात आली व गावातील सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळीं यात्रेदरम्यान संजीवनी ब्लड बँक लातूर व खंडोबा देवस्थान तपसेचिंचोली यांच्या माध्यमातून 8 डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर पार पडले यावेळी जवळपास 20 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 9 डिसेंबर रोजी बोरामणीकर यांचा भव्य जुगलबंदीमय भारुडाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन नेटके, अंगद नेटके, प्रमोद नेटके, परमेश्वर शिंदे, श्रीराम नेटके, प्रवीण कांबळे, सदानंद नेटके, बालाजी कदम, प्रवीण नेटके, सिताराम शिंदे, प्रदीप नेटके यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.