रामनाथ विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू
औसा (प्रतिनिधी) : रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला. ता.औसा.जि.लातूर.या विद्यालयांमध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा उपक्रम विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात मध्ये साजरा होत आहे. यानिमित्त संविधान दिनाचे महत्त्व सर्वांना समजावे यासाठी रांगोळी, निबंध, चित्रकला, व पोस्टर स्पर्धा, यांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांमध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दिव्यांग व इतर मुलांनी निबंध स्पर्धेत भाग घेऊन दिव्यांगाच्या प्रश्नावर आपले वेगवेगळे मतमतांतरे निबंध स्पर्धेमधून मांडले. त्याचबरोबर शालेय स्तरावर शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा की ज्यामध्ये स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या वेगवेगळ्या महान थोर व्यक्तींच्या वेशभूषा परिधान करून त्यांना एक प्रकारे अभिवादनच केले आहे. मुलांनी उत्सुकतेने यामध्ये सहभाग घेतला. तसेच प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे योगासने व मेडिटेशन करून मुलांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी गीत मंचाच्या माध्यमातून देशभक्ती पर
गीत गायन करून घेण्यात येत आहे. अशा वेगवेगळ्या उपक्रमातून रामनाथ विद्यालयांमध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा उपक्रम अतिशय नाविन्यपूर्ण पणे घेण्यात येत आहे. या सर्वांना प्रोत्साहित करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील, पर्यवेक्षक श्री आवटे ए. आय. विद्यालयातील क्रीडाशिक्षक श्री एल. पी. बिराजदार, अंबुलगे रंगनाथ, शिक्षिका सौ. हिंगणे जे. आर., सौ. निलंगेकर एस. एस., सौ. उकिरडे डी. आर., श्री सूर्यवंशी भास्कर व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हिरीरीने भाग घेत आहेत. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि सर्व संचालक मंडळ, पालक, ग्रामस्थ यांनी या उपक्रमाबद्दल विद्यालयाचे अभिनंदन केले आहे.